Wednesday, February 24, 2021

"राज्य शासनाचे पुरस्कार"

 पुरस्कार

"राज्य शासनाचे पुरस्कार" 

खेळाडूनी केलेल्या कामगिरीचा गौरवसाठी, खेळाच्या विकासासाठी व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र व राज्य शासना मार्फत विवध पुरस्कातांचे वितरण केले जाते. 

केंद्र शासनाकडून  दिले जाणारे पुरस्कार  

ऑलिंपिक, एशियाड, विश्वचषक, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याच प्रमाणे अंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य प्राप्त अथवा सहभागी खेळाडूंना त्यांच्या  खेळाच्या नैपुण्यावर , राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार,  तसेच अखिल भारतीय अंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये जास्त पदक प्राप्त विद्यापिठास मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार दिला जातो.  मा.सचिन तेंडूलकर  यांना  क्रीडा क्षेत्रातील  योगदाना  बद्दल  व त्यांच्या  कौशल्याच्या जोरावर भारतरत्न पुरस्कार देऊन संन्मानीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय  क्रीडा दिवस २९ ऑगस्ट ला भारताचे हॉकीचे महान खेळाडु स्व.मेजर ध्यानचंद यांच्या नावाने साजरा करण्यात येतो.    

राज्य  शासनाकडून दिले जाणारे पुरस्कार   

राज्य शासना मार्फत खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूनच्या अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व  राज्य पातळीवरील कामगिरीचा  विचार करून  खेळाडूना प्रोत्साहित करण्यासाठी व खेळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी खेलाडू, मार्गदर्शक, कार्यकर्ते  यांच्यासाठी  विविध  पुरस्काराची घोषणा केकेली आहे.

१. क्रीडा जीवन गौरव पुरस्कार :  ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/कार्येकर्ते  यांच्या साठी महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा, जीवन गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय सन २००१-२००२ पासून देण्यास सुरुवात केली.  सदर पुरस्कारामध्ये रोख रुपये एक लाख, सन्मानपत्र, स्मुर्तीचिन्ह, ब्लेझर यांचा समावेश असतो. सदर पुरस्कार ज्या व्यक्तीने क्रीडा व खेळासाठी आपले संपूर्ण आविश्य सर्वस्वी अर्पण केले  अश्या क्रीडा महार्षीनाचा क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जातो.

२. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू व कार्यकर्ते): शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन १९६८-६९ पासून सुरु केली. हा पुरस्कार मागील पाच वर्षा पासून कोणत्याही तीन वर्षाचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीतील क्रीडा नैपुण्याचे आवलोकन करून दिले जाते. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार योजने अंतर्गत शासनाने ४० क्रीडा प्रकारांना मान्यता दिलेली तसेच अपंगखेळाडु साठी तीन तर क्रीडा कार्यकर्त्यांसाठी एकूण सात पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता आहे. सदरच्या पुरस्कार  रोख रुपये एक लाख, सन्मानपत्र, स्मुर्तीचिन्ह, ब्लेझर यांचा समावेश असतो.

३. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार :  आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीतील क्रीडा नैपुण्याचे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांचा कामगिरीचा आढावा घेऊन तीन क्रीडा मार्गदर्शकांचा सन्मान करण्यात येतो सदरच्या पुरस्काराची सुरुवात शासनाने सन १९८८-८९ वर्षापासून केली. सदरच्या पुरस्कार  रोख रुपये एक लाख, सन्मानपत्र, स्मुर्तीचिन्ह, ब्लेझर यांचा समावेश असतो.  पूर्वी सदरच्या पुरस्काराचे नाव दादाजी कोंडदेव पुरस्कार असे होते.

४. एकलव्य क्रीडा पुरस्कार : शासनाने अपंग खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची दाखल घेऊन एकलव्य पुरुस्काराची सुरुवात करण्यात आली. सदरच्या पुरस्कार  रोख रुपये एक लाख, सन्मानपत्र, स्मुर्तीचिन्ह, ब्लेझर यांचा समावेश असतो.

५. जिजामाता क्रीडा पुरस्कार :  उत्कृष्ट महिला क्रीडा संघटक व क्रीडा मार्गदर्शकांना जिजामाता क्रीडा पुरस्कार दिला जातो. सदरच्या पुरस्कार  रोख रुपये एक लाख, सन्मानपत्र, स्मुर्तीचिन्ह, ब्लेझर यांचा समावेश असतो.

६. विशेष पुरस्कार :  साहसी उपक्रमा मध्ये अतुलीनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी वीशेष पुरस्कार दिला जातो. सदरच्या पुरस्कार  रोख रुपये एक लाख, सन्मानपत्र, स्मुर्तीचिन्ह, ब्लेझर यांचा समावेश असतो.   

संदर्भ :  क्रीडा शासकीय माहिती पुस्तिका व क्रीडा संचालक वेबसाईट .


  

 

No comments:

Post a Comment

KABBADDI PROJECT

  कबड्डी डॉ. उमेश अरुण बिबवे म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स , पुणे प्रस्तावना (Introduction) कबड्डी हा आपल्या भारत देशातील एक प्राच...