कबड्डी
डॉ.
उमेश अरुण बिबवे
म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
प्रस्तावना (Introduction)
कबड्डी
हा आपल्या भारत देशातील एक प्राचीन खेळ असुन,
हा
एक भारतीय सांघिक खेळ आहे. हुतुतू
या नावानेही हा खेळ प्रसिद्ध होता. महाराष्ट्रात
या खेळाबद्दल विशेष आवड आहे. बंगालमध्ये
‘हुडू’, दक्षिण
भारतात ‘चेडुगुडु’
व
उत्तर भारतात ‘कबड्डी’
अशा
विविध नावांनी हा खेळ पूर्वीपासून खेळला जात असे.
पूर्वी
या खेळाचे स्वरूप अनियमित होते. खेळाडूंच्या
संख्येला व क्रीडांगणाला मर्यादा नव्हती. दोन
संघांतील एकेका खेळाडूने आलटून पालटून श्वास रोखून विशिष्ट शब्दोच्चार करीत विरुद्ध
संघाच्या क्षेत्रात चढाई करून जावयाचे, त्यातील
प्रतिस्पर्ध्यांना हाताने किंवा पायाने स्पर्श करून त्यांना बाद करावयाचे व त्यांच्या
पकडीत न सापडता दम संपण्यापूर्वीच परत आपल्या क्षेत्रात येणे.
चढाई
करणाऱ्याचा दम जाईपर्यंत बचाव करणारांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करून मध्यरेषेला स्पर्श करावयास प्रतिबंध करावयाचा.
दम
गेला, तर तो खेळाडू बाद होतो.
परंतु
दम जाण्याच्या आत सुटून मध्यरेषेला त्याने स्पर्श केला तर त्याला पकडणारे सर्व खेळाडू
बाद होतात. हा
या खेळाचा मुख्य गाभा होय. नव्या
नियमांनी हा खेळ बांधला गेल्याने त्यात शिस्त येऊन वैयक्तिक व सांघिक कौशल्याला पुष्कळच
वाव मिळाला आहे.
कबड्डी
हा खेळ भारतामध्ये खुप लोकप्रिय आहे.
कबड्डीचा
इतिहास (History of Kabaddi)
या
खेळाची सुरुवात केव्हा व कशी झाली याविषयी निश्चित असे काही सांगता येत नाही.
परंतु
देशाच्या वेगवेगळ्या भागात हा खेळ थोड्याफार फरकाने खेळला जात होता.
हुतूतू
तीन तीन पद्धतीने खेळला जाई
१.
संजीवनी पद्धत:
या
पद्धतीच्या खेळात बाद झालेला खेळाडु क्रीडांगणाच्या बाहेर जात असे आणि ज्या संघाचा खेळाडू
बाद होईल त्याच्याविरुद्ध संघाचा खेळाडू जिवंत होतो व खेळात भाग घेऊ लागतो त्या पद्धतीला
संजीवन पद्धत म्हणतात. ज्या
पद्धतीने आज कबड्डीचा खेळ चालतो ती पद्धत होय.
२.
गनिमी पद्धत:
एकदा
बाद झालेला खेळाडु लोण होईपर्यंत एका डावात कधीही जिवंत होत नसे.
ह्या
पद्धतीत बारा मिनिटांचे डाव असत. वेळ
संपेपर्यंत वरील पद्धतीने खेळ चालू ठेवायचा असे.
३.
अमर पद्धत:
बाद
झालेल्या खेळाडूने क्रीडांगणाच्या बाहेर न जाता पुन्हा खेळण्यास लागावे. बाद झालेल्या खेळाडू
बद्दल फक्त गुणांची नोंद केली जात असे. या पद्धतीत लोण होत नाही.
वीस
वीस मिनिटांचे दोन डाव असतात.
पुण्याच्या
डेक्कन जिमखाना या संस्थेने १९१५-१९१६
या साली प्रथम या खेळाचे नियम तयार करून सामने भरविण्यास सुरुवात केली.
१९३१
साली अखिल महाराष्ट्र शारिरिक शिक्षण परिषदेचे चौथे अधिवेशन झाले.
त्यामध्ये
देशी खेळांचे नियम तयार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती.
१९३४
साली अकोला
येथे भरविण्यात आलेल्या अधिवेशनाच्या वेळी ते नियम अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण
मंडळाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले. समितीने
तयार करण्यात आलेल्या नियमांना १९३७ साली नाशिक येथे झालेल्या अधिवेशनात मान्यता देण्यात
आली व अखिल महाराष्ट्रात त्या नियमांचा अवलंब होऊ लागला.
सन
१९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती
यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लीन ऑलिम्पिक मध्ये प्रदर्शनीय सामना खेळला.
भारतीय
ऑलिम्पिक संघटनेच्या संयोजना खाली सन १९३८ साली कबड्डीच्या अखिल भारतीय स्पर्धा झाल्या.
सन
१९४४ मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेने हुतुतु च्या नियमांना मान्यता दिली.
खेळचा
दर्जा वाढावा आणि प्रसार व्हावा यासाठी कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाची सन १९५० मध्ये स्थापना
झाली.
भारत
देशामध्ये कबड्डी हा खेळ वेगवेगळ्या नावाने खेळाला जाई.
त्यामुळे
या खेळाला हुतूतू म्हणायचे का कबड्डी म्हणायचे हा वाद शिगेला पोहोचला होता.
१९५२
साली सदुभाऊ गोडबोले समितीने कबड्डी या शब्दाचा नियम केला व शिफारस केली.
१९५३
साली कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाने दम घेण्यासाठी कबड्डी या शब्दोच्चाराचाच वापर करण्याचा
ठराव मंजूर केला. तेव्हापासून
हा खेळ कबड्डी म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५२
साली पुरुषांसाठी चेन्नई ( मद्रास
) येथे पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
तसेच
१९५५ साली कलकत्ता येथे महिलांसाठी पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
शंकरराव
उर्फ बुवा साळवी यांनी कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी अपार मेहनत
घेतली. बुवा साळवी यांचा जन्म
दिवस १५ जुलै हा महाराष्ट्रामध्ये “कबड्डी
दिन” म्हणून साजरा केला जातो.
सन १९८२ साली एशियन कबड्डी असोसिएशनची स्थापना करण्यात आली.
सन
१९८२ साली नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये प्रदर्शनीय खेळ म्हणून
कबड्डीचा समावेश करण्यात आला. सन
१९९० साली बीजिंग येथे झालेल्या आशियाई स्पर्धेपासून कबड्डीचा आशियाई स्पर्धेमध्ये
समावेश करण्यात आला.
सन
२००४ साली पहिल्या जागतिक कबड्डी अजिंक्यपद (World Cup)
स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले.
सन
२०१४ साली प्रो कबड्डी लीग या व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन मशाल स्पोर्ट्स या
कंपनीने केले त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स
या वाहिनीवर करण्यात आले. प्रो कबड्डी लीग या व्यावसायिक स्पर्धेसाठी कबड्डी या खेळामधील
नियमांमध्ये बदल केले आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. नव्या स्वरूपातील
हि देशी खेळाची स्पर्धा कमालीची लोकप्रिय ठरली. प्रो कबड्डी लीग हि व्यावसायिक कबड्डी स्पर्धा या खेळाच्या इतिहासातील
मैलाचा दगड ठरली. या स्पर्धेमुळे कबड्डी हा खेळ घराघरा मध्ये पोहचला आणि या खेळाची लोकप्रियता आणखी वाढली.
क्रीडांगणाची
मोजमापे (Ground Measurement)
कबड्डी या खेळाचे
नियम (Rules of
Kabaddi)
कबड्डी
हा खेळ आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ आणि भारतीय हौशी कबड्डी संघटनेच्या अधिपत्याखाली खालील नियमानुसार
खेळला जातो.
१.
क्रीडांगण /
मैदान
अ.
क्रीडांगण
चाळुन घेतलेल्या स्वच्छ मातीचे सपाट व मऊ की जेणेकरून खेळताना खेळाडूंना दुखापत होणार
नाही अशा प्रकारचे असावे.
ब.
आज-काल
कबड्डीचे सामने सिंथेटिक मैदानावर म्हणजेच मॅटवर सुद्धा खेळविले जातात.
कबड्डीच्या
मॅटची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
जापानी
सिंथेटिक रबर+ इथिलीन
व्हिनेल एसीटेट २५ ते ३० शोर ए जाडी २५ मिमी ते ३० मिमी
क.
क्रीडांगणासाठी
२० मीटर × २०
मीटर जागा उपलब्ध असावी, परंतु
१७ मीटर × १८
मीटर पेक्षा कमी नसावी ( यामध्ये
लांबी १७ मीटर असावी)
२.
क्रीडांगणाचे क्षेत्र (Field
of Play)
अ.
पुरुष
व कुमार गट मुले
१३ मीटर
× १०मीटर
ब.
महिला
व कुमारी गट मुली १२ मीटर × ८
मीटर
क.
किशोर
गट मुले व मुली ११मीटर × ८
मीटर
३.राखीव
क्षेत्र (Lobbies)
क्रीडा
क्षेत्राच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या एक मीटर रुंदीच्या पट्ट्यानां राखीव क्षेत्र म्हणतात.
खेळाचे
नियम या सदराखालीं नियम क्रमांक चार प्रमाणे या राखीव क्षेत्राचा उपयोग ज्या वेळी केला
जातो त्यावेळी क्रीडांगणाच्या अंतिम मर्यादा म्हणजे या राखीव क्षेत्रासह मूळ क्रिडांगणाच्या
रेषा होत.
४.
बाद खेळाडूंसाठी बसण्याची जागा
(Sitting Block)
बाद
झालेल्या खेळाडूंना बसण्यासाठी जागा क्रीडांगणाच्या अंतिम रेषेपासून २ मीटरवर अंतरावर
असावी त्याचे क्षेत्र क्रीडांगणाची मोजमापे या सादर खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे
आयताकृती असावे.
५.
अंतिम मर्यादा
(Boundaries)
क्रीडांगणाच्या
चारही बाजूस असणाऱ्या रेषेस अंतिम मर्यादा म्हणतात.
या
रेषांची रुंदी 3 ते
5 सेंटिमीटर असावी.
टिप: अंतिम मर्यादेच्या चारही
बाजूस चार मीटर जागा मोकळी सोडणे आवश्यक आहे.
६.
मध्यरेषा
(Mid -Line)
क्रीडांगणाचे
दोन समसमान विभाग करणाऱ्या रेषेस मध्यरेषा म्हणतात
७.
अंगण
(Half)
मध्य
रेषेने विभागलेल्या क्रीडा क्षेत्राच्या प्रत्येक विभागास अंगण असे म्हणतात
८.
निदान रेषा
(Baulk Line)
मध्यरेषेस
समांतर असणाऱ्या दोन्ही अंगणातील रेषांस निदान रेषा असे म्हणता.
मध्य
रेषेपासून ही रेषा पुरुष व कुमार गट मुले विभागासाठी ३.७५
मीटर, महिला व कुमारी गट मुली
आणि किशोर गट मुले व मुली विभागासाठी ३ मीटर अंतरावर राहील.
९.
बोनस रेषा (Bonus
Line)
निदान
रेषेपासून १ मीटर अंतरावर अंतिम रेषेच्या कडे समांतर असलेल्या रेषेस बोनस रेषा असे
म्हणतात.
टीप:
ज्यावेळी
चढाई करणारच्या शरीराचा कोणताही भाग जोपर्यंत प्रतिपक्षाच्या अंगणातील बोनस रेषा आणि
अंतिम रेषा यामधील जमिनीस टेकलेला राहतो व शरीराचा कुठलाही भागाचा निदान रेषा बोनस
रेषा यामधील भागास स्पर्श नसतो अशा वेळी बोनस रेषा पूर्णपणे ओलांडली आहे असे समजावे.
१०.
वयाचे निकष
(Age Criteria)
अ.
पुरुष
व महिला: खुला
गट
ब.
कुमार
गट मुले व कुमारी गट मुली: २०
वर्षे व त्याखालील
क.
किशोर
गट मुले व मुली: १६
वर्षे व त्याखालील
११.
वजनाचे निकष
(Weight Criteria)
अ.
पुरुष:
८५
कि.ग्रॅ.
वजना
खालील
ब.
महिला:
७५
कि.ग्रॅ.
वजना
खालील
क.
कुमार
गट मुले : ७०
कि.ग्रॅ.
वजना
खालील
व
कुमारी गट मुली: ६५
कि.ग्रॅ.
वजना
खालील
क.
किशोर
गट मुले व मुली: ५५
कि.ग्रॅ.
वजना
खालील
कबड्डी
खेळातील महत्वाच्या संज्ञा (Important
Terminologies in the Game)
१.
दम
(Cant)
(श्वास
प्रक्रिया) मान्य
केलेला “कबड्डी”
हा
शब्द स्पष्ट स्वरात अखंडपणे एकाच श्वासात पुन्हा पुन्हा उच्चारित जाणे यास दम असे म्हणतात.
दम
घेण्याची कालमर्यादा ३० सेकंदाची असते.
२.
चढाई
(Raid)
चढाई
करणारा दम घेऊन प्रतिपक्षाच्या अंगणात प्रवेश करतो तेव्हा त्या क्रियेस चढाई असे म्हणतात.
या
प्रत्येक चढाईची कालमर्यादा ३० सेकंदांची असेल.
३.
चढाई करणारा
(Raider)
प्रतिपक्षाच्या
अंगणात दम घालीत जाणाऱ्या खेळाडूस चढाई करणारा असे म्हणतात.
चढाई
करणाऱ्याने प्रतिपक्षाच्या अंगणात स्पर्श करण्यापूर्वी दम घालण्यास प्रारंभ करावयास
हवा.
४.
बचाव करणारा
(Defender)
ज्या
अंगणात चढाईची क्रिया सुरू असेल त्या अंगणातील संघाच्या प्रत्येक खेळाडूस बचाव करणारा
असे म्हणतात.
५.
दम सोडणे किंवा जाणे
(Cant Break)
कबड्डी
- कबड्डी असा शब्दोच्चार सतत एकाच श्वासात करीत असताना
मध्येच श्वास घेणे या क्रियेस 'दम
सोडणे किंवा दम जाणे' असे
म्हणतात. दम
घेणे व तो सुरू ठेवणे या दोन्ही क्रिया प्रथम घेतलेल्या एकाच श्वासात होणे आवश्यक आहे.
दम
हा एकाच श्वासात जास्तीत जास्त ३० सेकंदाचा असावा.
जर
चढाई करणाऱ्याने आपल्या अंगणात सुरक्षित येण्यासाठी ३० सेकंदाची कालमर्यादा ओलांडल्यास
तो बाद झाला असे पंचांनी घोषित / जाहीर
करावे.
६.
गडी बाद करणे
(To put out a Defender)
नियमांचे
उल्लंघन न करता चढाई करणाऱ्याने बचाव करणाऱ्यास स्पर्श करणे किंवा चढाई करणाऱ्याच्या
शरीराच्या कोणत्याही भागास बचाव करणाऱ्याचा स्पर्श होऊन चढाई करणाऱ्याचा स्वतःच्या
अंगणात दम न सोडता स्पर्श होणे या क्रियेस गडी बाद करणे असे म्हणतात.
७.
गडी धरणे
/ गडी पकडणे
(Catch)
नियमांचा
भंग न करता बचाव करणाऱ्यांनी चढाई करणार्यास
त्याचा दम जाईपर्यंत आपल्या अंगणात धरून ठेवणे व त्यास त्याच्या अंगणात जाऊ न देणे
किंवा सरपंच / पंच
यांनी शिट्टी वाजविण्यापर्यंत धरून ठेवणे या क्रियेस गडी धरणे अथवा गडी पकडणे असे म्हणतात.
८.
अंगणात सुरक्षित येणे
(To Reach Safely)
चढाई
करणाऱ्याने स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही भागाने मध्यरेषा ओलांडून नियमांचे उल्लंघन
न करता ३० सेकंदाच्या आत स्वतःच्या अंगणास स्पर्श करणे यास स्वतःच्या अंगणात सुरक्षित
येणे असे म्हणतात.
९.
स्पर्श
(Tag / Touch)
चढाई
करणाऱ्याचा बचाव करणाऱ्यास किंवा करणाऱ्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागास कपड्याने,
जोड्याने
अथवा शरीराच्या कोणत्याही अवयवाने संपर्क झाला म्हणजे स्पर्श झाला असे म्हणतात.
१०.
झटापट
(Struggle)
जेव्हा
बचाव करणाऱ्याचा अथवा करणाऱ्यांचा चढाई करणार्यास
स्पर्श होतो त्या क्रियेस झटापट असे म्हणतात.
स्पर्श
अथवा झटापट झाल्यानंतर राखीव क्षेत्राचा क्रीडा क्षेत्रामध्ये समावेश होतो.
११.
अनुत्पादित चढाई
(Empty / Unproductive Raid)
चढाई
करणाऱ्याने चढाई करीत असताना प्रतिपक्षाच्या अंगणातील निदान रेषा एक वेळ तरी ओलांडून
स्वतःच्या अंगणात गुण न घेता आणि न गमावता दम घेत परत येणे या क्रियेस अनुत्पादित चढाई
असे म्हणतात.
टिप:
अ.ज्यावेळी
चढाई करणाऱ्याच्या शरीराचा कोणताही भाग जोपर्यंत प्रतिपक्षाच्या अंगणातील निदान रेषा
आणि शेवटचे अंतिम रेषा यामधील जमिनीस टेकलेला राहतो व शरीराच्या कुठल्याही भागाचा मध्यरेषा
व निदान रेषा यामधील भागात स्पर्श नसतो त्या वेळी निदान रेषा पूर्णपणे ओलांडली गेली
असे समजावे.
१२.
यशस्वी चढाई
(Productive Raid)
चढाई
करत असताना कोणत्याही संघास गुण मिळाल्यास त्या चढाईस यशस्वी चढाई असे म्हणतात
१३.
पाठलाग
(Pursuit)
आपल्या
अंगणात परत जाणाऱ्या चढाई करणार्यास
बाद करण्याच्या हेतूने बचाव करणारा नियमांचा भंग न करता दम घेऊन प्रतिपक्षाच्या अंगणात
धावून जातो या क्रियेस पाठलाग असे म्हणतात.
१४.
निर्णायक चढाई
(Do or Die) एका संघाच्या सलग दोन अनुत्पादित चढायानंतर
(Empty Raid) येणाऱ्या चढाईस तिसरी चढाई असे म्हणतात.
मध्यंतरानंतर
खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिल्याच चढाईपासून चढाई मोजण्यास सुरुवात करावी.
१५.
अव्वल पकड
(Super Catch/ Tackle)
ज्यावेळेस
बचाव करणाऱ्यांच्या अंगणामध्ये ३ किंवा त्यापेक्षा कमी खेळाडू असतील त्यावेळेस चढाई
करणाऱ्याची पकड झाली, तो
स्वतःहून बाद झाला किंवा त्याला पंचांनी बाद घोषित केले त्याला अव्वल पकड असे म्हणतात.
अव्वल
पकड झाल्यास बचाव करणाऱ्या संघास १ जास्तीचा गुण देण्यात येतो.
१६.
लोण
(All Out)
ज्यावेळेस
एक संघ प्रतिस्पर्धी संघाचे सर्व खेळाडू बाद करतो किंवा प्रतिस्पर्धी संघाचे सर्व खेळाडू
बाद झाले आणि कोणताही ही प्रतिस्पर्धी खेळाडू पुन्हा जिवंत होऊ शकत नसेल,
तर
त्या संघाने लोण केला असे समजावे व बाद केलेल्या खेळाडूंच्या गुणांव्यतिरिक्त लोण साठीचे
दोन जादा गुण जाहीर करावेत.
खेळाचे
नियम (Rules of Play)
१.
नाणेफेक
जिंकणार्या
संघास अंगण अथवा चढाई यापैकी एकाची निवड करण्याचा अधिकार राहील आणि नाणेफेक हरणाऱ्यास
अंगण अथवा चढाई यातून राहिलेल्या एकाची निवड करता येईल.
दुसऱ्या
डावात अंगणाची अदलाबदल करावी आणि ज्या संघाने आपला खेळाडू प्रथम चढाईस पाठविला नसेल
त्या संघाने आपला खेळाडू चढाईस पाठवावा. पहिला
डाव संपण्याच्या वेळी जितके खेळाडू खेळत असतील तितक्याच खेळाडुंनी दुसरा डाव सुरू करावा.
२.
खेळ
चालू असताना खेळाडूच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा अंतिम मर्यादेबाहेर जमिनी स्पर्श
झाल्यास तो खेळाडू बाद झाला असे समजावे पण झटापटीच्या वेळी मात्र खेळाडूच्या शरीराचा
कोणताही भाग क्रीडांगणाच्या मर्यादेच्या आत जमिनीस लागलेला असेल तोपर्यंत तो बाद झाला
असे होत नाही.
३.
अ.
खेळ
चालू असताना खेळाडू अंतिम मर्यादेबाहेर गेला तर तो बाद झाला असे समजावे अशा खेळाडूस
सामना अधिकाऱ्यांनी त्वरित क्रीडांगणावर बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा.
पंच
अथवा सरपंच यांनी त्या खेळाडूचा क्रमांक सांगून बाद म्हणून मोठ्याने जाहीर करावे. चढाई चालू असेपर्यंत
शिट्टी वाजवून नये.
ब.
बचाव
करणारा जर क्रमांक ३ अ च्या नियमान्वये क्रीडांगण बाहेर गेला असेल व त्याने चढाई करणार्यास
पकडले, तर चढाई करणारा नाबाद
जाहीर करावा. बचाव
करणारा अथवा करणारे अंतीम मर्यादा बाहेर गेले असतील ते बाद झाल्याचे जाहीर करावे बचाव
करणारा अथवा करणारे क्रीडांगणाबाहेर गेल्याने बाद होऊनही परत पकडीत सहभागी झाल्यास
त्याच्या या कृत्याबद्दल बाबत विरोधी संघास एक तांत्रिक गुण द्यावा.
४.
झटापट
सुरू झाली की राखीव क्षेत्राचा क्रीडा क्षेत्रामध्ये समावेश होतो.
झटापट
संपल्यानंतर झटापटीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंनी आपापल्या अंगणात प्रवेश करीत असताना
राखीव क्षेत्राचा उपयोग केला तरी चालेल. (हा
नियम फक्त बचाव करणाऱ्याच्या अंगणातील क्रियेस ग्राह्य धरला जाईल.)
५.
चढाई
करणाऱ्याने दम घालण्याच्या वेळी "कबड्डी"
हा
शब्द उच्चार स्पष्ट केला पाहिजे. जर
तो "कबड्डी"
असा
सुस्पष्ट दम घेत नसेल तर पंचांनी त्यास परत पाठवावे आणि विरुद्ध संघास एक तांत्रिक
गुण देऊन पुन्हा त्यांना चढाईची संधी द्यावी.
६.
चढाई
करणाऱ्याने प्रतिपक्षाच्या अंगणास स्पर्श करण्यापूर्वी दम घालण्यास प्रारंभ केला पाहिजे.
जर
त्याने उशिरा दम घालण्यास प्रारंभ केला तर पंच किंवा सरपंचाने विरुद्ध संघास एक तांत्रिक
गुण जाहीर करुन त्यास पुन्हा चढाईची संधी द्यावी.
७.
आपली
पाळी नसताना जर एखादा खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस गेला तर पंचांनी अथवा सरपंचांनी
त्याच परत पाठवावे व विरूद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा.
८.
एका
वेळेस फक्त एकच खेळाडूने प्रतिपक्षाचे अंगणात चढाई जावे.
एका
वेळी जर एकाहून अधिक खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात चढाईस गेले तर पंच अथवा सरपंचाने
त्यांना परत बोलवावे व विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण जाहीर करून पुन्हा त्यांना चढाईची
संधी द्यावी.
९.
चढाई
करणारा परत आपल्या अंगणात आल्यावर किंवा प्रतिपक्षाच्या अंगणात बाद झाल्यास लागलीच
दुसऱ्या संघाने आपला एक खेळाडू विरुद्ध संघाच्या अंगणात पाच सेकंदाच्या आत चढाईस पाठवावा.
अशा
तऱ्हेने आळीपाळीने चढाई करण्यास खेळाडू पाठविण्याचा क्रम खेळ संपेपर्यंत चालू ठेवावा
मात्र चढाई करणाऱ्याने चढाई करण्यासाठी पाच सेकंदापेक्षा जास्त वेळ घेतल्यास त्याची
चढाईची पाळी संपली असे जाहीर करून विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा व पुन्हा त्यांना
चढाई करण्यास सांगावे.
१०.
चढाई
करणार्यास बचाव करणाऱ्यांनी
पकडले असता चढाई करणारा जर त्यांच्या पकडीच्या प्रयत्नातून सुटून सुरक्षित आपल्या अंगणात
आल्यास त्याचा पाठलाग करता येणार नाही. परंतु
चढाई करणारा बचाव करणारा किंवा करणाऱ्यांना केवळ स्पर्श करून आपल्या अंगणात सुरक्षित
परत जात असेल अशावेळी त्याचा पाठलाग करता येईल.
११.चढाई
करत असताना प्रतिपक्षाच्या अंगणात जर चढाई करणाऱ्याचा दम गेला तर तो बाद झाला असे समजावे.
१२.
चढाई
करताना चढाई करणारा पकडला गेल्यावर बचाव करणार्याने हेतू परस्पर त्याच्या
तोंडावर हात ठेवून त्याच्या दमात अडथळा करू नये.
तसेच
कोणत्याही स्वरूपाची कैची अथवा दुखापत होईल असे आरोग्यास अपायकारक उपाय योजून पकड करू
नये. तसे घडल्याचे दृष्टीस
आल्यास चढाई करणारा बाद नसल्याचे पंचांनी अथवा सरपंचांनी जाहीर करावे.
१३.
बचाव
करणाऱ्याने स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही भागाने चढाई करणार्यास
हेतू परस्पर अंतिम मर्यादेबाहेर ढकलू नये तसेच चढाई करणाऱ्याने हेतू परस्पर बचाव करणाऱ्या
अंतिम मर्यादेबाहेर ढकलू नये अगर ओढू नये. जर
चढाई करणारा अंतिम मर्यादेबाहेर ढकलला गेला असेल तर पंचांनी अथवा सरपंचाने अशा अंतिम
मर्यादेबाहेर ढकलणाऱ्या अथवा ओढणाऱ्या खेळाडूस बाद म्हणून जाहीर करावे.
१४.
चढाई
करणारा खेळाडू जोपर्यंत आपल्या अंगणात परत येत नाही तोपर्यंत बचाव करणाऱ्या खेळाडूने
पैकी कोणीही आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाने चढाई करणार्या
खेळाडूच्या अंगणात पलीकडे स्पर्श करता कामा नये तसे केल्यास ते बाद होतील व प्रतीपक्षास
तेवढे गुण मिळतील.
१५.
नियम
क्रमांक १४ प्रमाणे बाद झालेल्या बचाव करणाऱ्या खेळाडूने जर चढाई करणार्यास
पकडले किंवा पकडण्यास मदत केली असेल तर विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा व चढाई
करणारा आपल्या अंगणात सुरक्षितपणे आला असे समजावे आणि ज्या बचाव करणारा खेळाडू अथवा
खेळाडूंचा प्रतिपक्षाच्या अंगणास स्पर्श झाला असेल त्यासच बाद म्हणून जाहीर करावे.
१६.
एखाद्या
संघाने प्रतिपक्षाचे सर्व गडी बाद केले अथवा प्रतिपक्षाचे सर्व गडी बाद झाले व विरुद्ध
पक्षाचा गडी कुणीच पुन्हा जिवंत होऊ शकत नसेल तर त्या संघाने लोण केला असे समजावे व
बाद केलेल्या खेळाडूच्या व्यतिरिक्त लोणचे दोन जादा गुण जाहीर करावेत.
यानंतर
दोन्ही संघातील खेळाडू आपापल्या अंगणात १० सेकंदात प्रवेश करतील अन्यथा पंच अथवा सरपंच
प्रतिपक्षास तांत्रिक गुण जाहीर करतील त्यानंतरही ही एखादा संघ आपल्या अंगणात प्रवेश
करीत नसेल तर सरपंच अशा संघास आपल्या अंगणात येण्याची सूचना करेल याउपरही तो संघ एक
मिनिटाच्या आत आपल्या अंगणात आला नाही तर तो संघ त्या सामन्यात पुरता बाद करुन विरुद्ध
संघ जिंकल्याचे जाहीर करावे.
१७.
चढाई
करणारा प्रतिपक्षाच्या अंगणात चढाई करत असताना त्याला त्याच्या संघातील एखाद्या खेळाडूने
अन्य प्रकारे सुचित केल्यास पंचांनी अथवा सरपंचाने विरुद्ध संघास एक तांत्रिक गुण द्यावा.
१८.
चढाई
करणाऱ्या खेळाडूस जाणून-बुजून
त्याचे कपडे अथवा केस धरून पकड केल्यास त्या खेळाडूस नाबाद म्हणून जाहीर करावे.
आणि
नियमाचा भंग करणाऱ्या बचाव पक्षाच्या खेळाडूस बाद म्हणून जाहीर करावे.
१९.
प्रतिपक्षाचा
एक किंवा अनेक खेळाडू बाद झाले म्हणजे दरवेळी बाद करणाऱ्या संघाचा खेळाडू बाद झालेल्या
क्रमांकाने जिवंत होतो.
सामन्या
संबंधी नियम ( Rules of Matches)
१.
संघ
(Team)
प्रत्येक
संघात कमीत कमी १० खेळाडू आणि जास्तीत जास्त १२ खेळाडू असतील.एका
वेळेस ७ खेळाडू क्रीडांगणात खेळावयास उतरतील आणि उरलेले ५ खेळाडू राखीव म्हणून राहतील.
२.
सामन्याची कालमर्यादा (Duration
of the Match)
सामन्याची
कालमर्यादा पुरुष व कुमार गट मुलांसाठी २० मिनिटांचे
(२०+५+२०)
व
महिला, कुमार गट मुली,
किशोर
गट मुले व मुली यांसाठी १५ मिनिटांचे (१५+५+१५)
आणि
५ मिनिटांच्या विश्रांतीने विभागलेल्या अशा दोन भागांचे असेल.
विश्रांतीनंतर
अंगणाची अदलाबदल करावी पहिला डाव संपण्याच्या वेळी जितके खेळाडू असतील इतक्यात खेळाडूंनी
दुसरा डाव सुरू करावा.
टिप:
प्रत्येक
डावाची शेवटची चढाई चालू असताना जर वर नमूद केलेली खेळाची ठराविक वेळ संपली असेल तर
ही चढाई पूर्ण होऊ द्यावी.
३.
गुणपत्रक भरण्याची पद्धत
(System of Scoring)
अ.
प्रतिपक्षाच्या
बाद झालेल्या प्रत्येक खेळाडूगणिक १ गुण विरुद्ध संघाला मिळेल.
ब.
अव्वल
पकड (Super Catch) केल्यास
पकडीचा एक व अधिकचा एक असे २ गुण संघास मिळतील.
क.
जो
संघ प्रतिस्पर्ध्यावर लोण देईल त्या संघात लोण साठीचे २ गुण मिळतील.
गडी
बाद होणे व जिवंत होणे हा नियम सामना संपेपर्यंत लागू राहील.
४.
तृटीत काळ
(Time Out)
अ.संघनायक,
संघ
प्रशिक्षक किंवा कोणताही सहभागी खेळाडू सरपंचांच्या परवानगीने खेळाच्या मध्यांतराअगोदर
दोन वेळा व मध्यांतरानंतर दोन वेळा तृटीत काळ मागू शकेल.
मात्र
अशा प्रत्येक तृटीत काळाची मर्यादा ३०सेकंदापेक्षा जास्त नसेल.
तृटीत
कालावधीत जेवढा वेळ गेला असेल तेवढाच वेळ उरलेल्या खेळात समाविष्ट करण्यात येईल.
ब.
अशा
तृटीत काळात खेळाडूंना आपले अंगण सोडून जाता येणार नाही.
जो
खेळाडू या नियमांचे उल्लंघन करील त्या संघाविरुद्ध एक तांत्रिक गुण जाहीर करण्यात येईल.
क.
वीजपुरवठा
बंद पडणे, मुसळधार
पाऊस पडणे, लोकांनी
व्यत्यय आणणे, खेळाडू
जखमी झाल्यास, क्रीडांगणाच्या
रेषा पुन्हा आखाव्या लागल्यास इत्यादी कारणास्तव पंच/
सरपंच
अधिकृत तृटीत काळ घेऊ शकतात. तृटीत
कालावधीत जेवढा वेळ गेला असेल तेवढा वेळ उरलेल्या वेळात समाविष्ट करण्यात येईल.
५.
खेळाडू बदली करणे
(Substitution)
अ.
सरपंचाच्या
परवानगीने पाच खेळाडू सामन्याच्या मध्यांतर व तृटित कालावधीत बदलता येतील.
ब.
बदललेला
खेळाडू पुन्हा बदली खेळाडू म्हणून घेता येईल.
क.जर
एखादा खेळाडू सामन्यासाठी निलंबित अथवा सामना कालावधीसाठी बडतर्फ झाल्यास त्याच्या
ऐवजी बदली खेळाडू घेता येणार नाही. तो
संघ तितक्या
कमी संख्येने खेळ खेळेल.
ड.
अधिकृत
तृटित (Official Time Out) कालावधीत खेळाडू बदलता
येणार नाही.
इ.
बाद
झालेल्या खेळाडू ऐवजी बदली खेळाडू घेता येणार नाही.
६.
बोनस गुण
(Bonus Point)
अ.
चढाई
करणाऱ्याने बोनस रेषा ओलांडल्यास एक बोनस जाहीर करावा.
बोनस
रेषा ओलांडल्यानंतर चढाई करणारा पकडला गेला तर तो बाद झाल्याचे जाहीर करावे व विरुद्ध
संघास एक गुण द्यावा.
ब.
अंगणात
कमीत कमी सहा बचाव करणारे खेळाडू असतील तर बोनस नियम लागू होईल.
बोनस
गुण चढाई संपल्यानंतर पंच अथवा सरपंचाने आपल्या हाताचा अंगठा वर करून जाहीर करणे.
क.
चढाई
करणारा खेळाडू जर बोनस रेषा ओलांडत असताना पकडला गेला तर बोनस गुण जाहीर करता येणार
नाही. बचाव करणाऱ्या संघास
१ गुण जाहीर करावा.
ड.
चढाई
करणाऱ्याने बोनस रेषा ओलांडल्यानंतर जर बचाव पक्षातील एक किंवा अनेक खेळाडूंना स्पर्श
करून आपल्या अंगणात आला असेल तर त्यास १ बोनस गुण द्यावा व त्याने बाद केलेल्या खेळाडूंचे
गुणही द्यावेत.
इ.
चढाई
करणाऱ्याने बचाव पक्षातील खेळाडू अथवा खेळाडूंना स्पर्श करण्याअगोदर अथवा बचाव करणाऱ्यांनी
चढाई करणा-याची
पकड करण्याअगोदर बोनस रेषा ओलांडली तरच बोनस गुण जाहीर करावा.
स्पर्श
अथवा झटापट झाल्यावर चढाई करणाऱ्याने बोनस रेषा ओलांडली तर बोनस गुण देता येणार नाही.
फ.
बोनस
गुण जाहीर झाल्यास बाद खेळाडू जिवंत होऊ शकत नाही.
ग.
जर
एक किंवा अनेक खेळाडू निलंबित अथवा बडतर्फ करण्यात आले असतील तर बोनस रेषा ओलांडण्याचा
नियमानुसार ते खेळाडू अंगणात आहेत असे गृहीत धरून बोनस गुण जाहीर करावा.
७.
अव्वल पकड
(Super Catch)
अ.
अंगणात
तीन किंवा त्यापेक्षा कमी बचाव पटू असताना त्यांनी पकड केल्यास ती अव्वल पकड समजावी.
पकड
करणाऱ्या संघास पकडीच्या गुणा बरोबर एक जादा गुण म्हणजे एकूण दोन गुण द्यावेत.
ब.
अंगणात
तीन किंवा त्यापेक्षा कमी बचाव पटू असताना चढाईपटू स्वयंचित
(Self Out) झाल्यास ही अव्वल पकड
(Super Catch)समजावी.
क.
अंगणात
चार बचाव पटू असताना त्यातील एक स्वयंचित (Self Out) झाला
व उर्वरित तीन खेळाडूंनी चढाईपटुची पकड केली तर ती अव्वल पकड
(Super Catch) समजावी.
ड.
जेव्हा
एक किंवा त्यापेक्षा जादा खेळाडू निलंबित असतील तर जेवढे खेळाडू निलंबित असतील ते खेळाडू
अंगणात गृहीत धरून अव्वल पकड हा नियम अमलात आणावा.
इ.
अव्वल
पकड (Super Catch) हा
नियम चढाई पटू व बचाव पटू दोघेही बाद असतानाही ग्राह्य मानला जाईल.
८.
निर्णायक चढाई
( Do or Die)
अ.
पहिल्या
दोन सलग चढाया अनुत्पादित (Unproductive/
Empty) झाल्यास तिसरी चढाई ही निर्णायक असावयास
हवी. या चढाईत गुण न नोंदविल्यास
ती चढाई अनुत्पादित समजून चढाईचा खेळाडू बाद दिला जाईल व प्रतिस्पर्धी संघास १ गुण
दिला जाईल. प्रत्येक
डावाच्या सुरूवातीची चढाई ही त्या त्या संघाची पहिली चढाई समजावी.
ब.
खेळाडू,
प्रशिक्षक
किंवा व्यवस्थापक यांना पिवळे किंवा लाल कार्ड दाखवून विरुद्ध संघाला तांत्रिक गुण
जाहीर केल्यास हा गुण निर्णायक चढाईसाठी ग्राह्य धरता येणार नाही.
९.
अंतिम निकाल
(Result):
संपूर्ण
खेळ संपल्यानंतर ज्या संघाची गुणसंख्या अधिक असेल तो संघ विजयी झाल्याचे जाहीर करावे.
१०.
बाद पद्धतीत समान गुण झाल्यास
(Tie in Knock Out Match):
अ.
दोन्ही
संघात बचाव करण्याकरता सात खेळाडू अंगणात असतील आणि दोन्ही संघांना प्रत्येकी पाच चढायांची
संधी आळीपाळीने दिली जाईल.
ब.
अशा
वेळी निदान रेषेवर बचाव करुन खेळ खेळला जाईल.
क.
यावेळी
निदान रेषा ही बोनस रेषा नियमाप्रमाणे गृहीत धरली जाईल आणि बोनस रेषेचे सर्व नियम अंमलात
येतील.
ड.
चढाई
करणाऱ्याने बोनस रेषा सम निदान रेषा ओलांडल्यास एक गुण दिला जाईल.
ई.
चढाई
करणारा जर बोनस रेषा सम निदान रेषा ओलांडून बचाव पक्षातील एक किंवा अनेक खेळाडूंना
स्पर्श करून आपल्या अंगणात सुरक्षित आला तर त्यास एक बोनस गुण द्यावा व त्याने बाद
केलेल्या खेळाडूंचे गुणही द्यावेत.
इ.
अशावेळी
खेळाडू बाद किंवा जिवंत होणे ही प्रक्रिया अंमलात न आणता फक्त गुण मिळाल्याचे गृहीत
धरले जाईल.
फ.
५-५
चढाया सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघांच्या संघनायकाने पाच चढाई करणाऱ्या खेळाडूंचा
क्रमांक,
नाव व क्रमवारी चढाई करण्यासाठी देणे आवश्यक
आहे. अशा वेळी बचाव करताना
सात खेळाडूंपैकी खेळाडू बदलता येणार नाही.
प. सरपंच दिलेल्या क्रमवारीनुसार
आळीपाळीने चढाई करण्यास सांगेल.
चढाईसाठी
दिलेल्या यादीतील पाच खेळाडूंना पैकी जर एखाद्या खेळाडूस त्याची चढाईची पाळी येण्यापूर्वी
दुखापत झाल्यास उर्वरित दोन खेळाडूंपैकी एकास चढाईची पाळी देता येईल.
ज्या
संघाने खेळ सुरू करताना प्रथम चढाई केली असेल त्याच संघास यावेळी पहिली चढाई दिली जाईल.
यानंतर
ही समान गुण झाल्यास सुवर्ण चढाई (Golden Raid) या
नियमाचा आधार घेतला जाईल.
सुवर्ण
चढाई (Golden Raid):
५-५
चढाई नंतरही जर सामना समान गुणांवर असेल तर चढाई करिता नव्याने नाणेफेक केली जाईल.
जो
संघ नाणेफेक जिंकेल त्या संघास सुवर्ण चढाई (Golden
Raid) करण्याची संधी दिली जाईल.
सुवर्ण
चढाई नंतरही सामना समान गुणांवर असेल तर प्रतिस्पर्धी संघास सुवर्ण चढाई करण्याची संधी
दिली जाईल.
सुवर्ण
चढाईत तो संघ निर्णायक गुण मिळवेल तो संघ विजयी ठरविला जाईल.
याउपरही
सामना समान गुणांवर संपला तर नाणेफेक करून सामना निर्णायक करावा.
११.
साखळी पद्धत
(Le
साखळी
पद्धतीने खेळविण्यात येणार या सामन्यात विजयी संघास दोन गुण व हरणाऱ्या संघात शून्य
गुण देण्यात येतील आणि दोन्ही संघांचे समान गुण झाल्यास प्रत्येकी एक गुण देण्यात येईल.
साखळी
सामन्यातील निर्णायक पद्धत:
साखळी
पद्धतीतील सामन्यात विभागातील संघांचे समान साखळी गुण झाल्यास त्या संघांनी मिळविलेले
गुण व गमावलेले गुण यांची सरासरी काढून गुणानुक्रमे विजयी व उपविजयी संघ ठरविण्यात
यावे असे करताना खालीलप्रमाणे सुत्र वापरावे.
अ.
गुणांची
सरासरी काढताना ज्या संघाने २५% साखळी
गुण प्राप्त केले नसतील त्या संघांचे गुण या क्षेत्रासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
ब.
ज्या
संघांनी २५% किंवा
त्यापेक्षा जास्त साखळी करून प्राप्त केले असतील अशा संबंधित संघांचे साखळी गुणांचा
मिळविलेले गुण व गमविले गुण या सूत्रानुसार फरक काढावे आणि ज्या संघाने मिळालेले गुण
व गमावलेले गुण यातील गुण फरकानुसार विभागात जास्त गुण मिळवणारा संघ विजेता ठरवावा.
क.
यानंतरही
समान गुण झाल्यास ज्या संघांची एकूण मिळालेल्या गुणांची संख्या जास्त तो संघ अनुक्रमे
विजयी उपविजयी ठरवावा.
ड.
यानंतरही
समान गुण झाल्यास दोन संघातील लढतीत जो संघ जास्त गुणांच्या फरकाने विजयी झाला असेल
तो संघ विजयी ठरेल.
इ.
यानंतरही
समान गुण झाल्यास विभागात मिळविलेले गुण व गमावलेले गुण यांचे सरासरी काढून ठरवावी.
यावेळी
ज्या संघाने २५% पेक्षा
कमी साखळी गुण मिळवले असतील त्याही संघाचे गुण सरासरी काढताना ग्राह्य धरावे.
फ.
यानंतरही
समान गुन झाल्यास नाणेफेक करून विजयी व विजयी संघ ठरवावेत.
टीप:एखादा
संघ गटात गैरहजर राहिल्यास अगर एखाद्या संघाने न खेळता पुढे चाल दिल्यास अथवा वेळेपूर्वी
डाव सोडून पुढे चाल दिल्यास सरासरी काढताना त्या संघाचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत
व अशा संघास या स्पर्धेतून बाद ठरवले जाईल. जो
संघ गैरशिस्तीच्या कारणाने बडतर्फ केला जाईल त्या संघास देखील हा नियम लागू केला जाईल.
१२.
वीजपुरवठा
बंद पडला किंवा मुसळधार पाऊस पडला अथवा अन्य तत्सम परिस्थितीमुळे सामना त्याच सत्रात
पूर्ण होऊ शकला नाही, तर
तो पुढच्या सत्रात पुन्हा संपूर्ण वेळ खेळावावा. पुन्हा सुरू होणाऱ्या
खेळाचे वेळी पूर्वीचे खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी असावेत असे नाही.
१३.
नैसर्गिक
कारणास्तव सामना तात्पुरत्या कालावधीसाठी थांबला असेल तर तो सामना त्याच गुणाने व उरलेल्या
वेळेत त्याच सत्रात सुरू करता येईल.या
तहकुबीचा कालावधीमध्ये सरपंचांच्या पूर्वपरवानगीशिवाय खेळाडूंना आपले आंगण सोडून जाता
येणार नाही जो संघ या नियमाचे उल्लंघन करील त्या संघाविरुद्ध एक तांत्रिक गुण देण्यात
येईल.
१४.
सर्व
खेळाडूंचा पाठीवर कमीत कमी सहा इंच लांबीचे व छातीवर चार इंच लांबीचे क्रमांक असले
पाहिजेत.
खेळाडूंचा पोशाख नियमाला धरून असणे आवश्यक
आहे.
१५.
शरीराला
किंवा इतर अवयवांना तेल किंवा तत्सम निसरडी वस्तू लावलेली असता कामा नये.
१६.
मॅटवरील
सामन्याच्या वेळी बूट असणे / वापरणे
आवश्यक आहे.
नियमोल्लंघन (Gross Violations & Foul):
अ.
निकालाबाबत
सामान अधिकाऱ्यांना वारंवार विचारणे.
ब.
सामान्य
अधिकारांबाबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असभ्य अनादरणीय उद्गार काढणे.
क.
चढाई
करणाऱ्याने किंवा बचाव करणाऱ्या ने बोट दाखवून निर्णयाची मागणी करणे.
ड.
चढाई
करणार्याचा दम तोंड बंद करून
अथवा गळा दाबून अथवा अन्य मार्गाने घालविण्याचा प्रयत्न करणे.
इ.
कोणत्याही
संघाने आपला खेळाडू चढाई पाठविण्यास पाच सेकंद पेक्षा अधिक कालावधी घेतल्यास
फ.
शरीरास
दुखापत होण्याची शक्यता असलेले अयोग्य उपाय खेळताना वापरल्यास
ग.
हाता
पायाच्या घातलेल्या कैचीच्या सहाय्याने चढाई करणार्याची
पकड करणे.
ह.
कोणत्याही
प्रशिक्षकाने किंवा खेळाडूने बाहेरून सूचना दिल्यास
ज.
चढाई
करणार्याची चढाईची पाळी असता
त्यास प्रतिबंध केल्यास पंच / सरपंच
आपल्या अधिकार वापरू शकतात.
उपरोक्त
नमूद केलेल्या अगर क्रीडावृत्तीला विशोभित असलेल्या कोणत्याही कृत्याबद्दल सरपंच अथवा
पंच आपल्या अधिकारात ताकीद देणे, गुण
जाहीर करणे, तात्पुरते
निलंबित करणे अगर त्या सामन्यात पुरता अथवा स्पर्धे पुरता खेळाडू किंवा संघ निलंबित/बहिष्कृत
करणे यापैकी काही करू शकेल.
खेळाडू,
प्रशिक्षक,
संघ
व्यवस्थापक, संघ
यांना ताकीद देणे, तात्पुरते
निलंबित करणे, सामन्यापूरते
निलंबित करणे किंवा बडतर्फ करण्यासाठी पंच व सरपंच कार्ड दाखवू शकतो.
अ.
हिरवे कार्ड:
ताकीद देणे करिता
जर
खेळाडू, प्रशिक्षक,
संघ
व्यवस्थापक, संघ
यांना हिरवे कार्ड दाखविल्यास, त्यानंतर
पुढील कार्यवाहीसाठी सरळ पिवळे कार्ड दाखवावे.
ब.
पिवळी कार्ड
: दोन मिनिटे तात्पुरते निलंबन करणे
जर
खेळाडू, प्रशिक्षक,
संघ
व्यवस्थापक, संघ
यांना पिवळे कार्ड दाखविल्यास त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी सरळ लाल कार्ड दाखवावे.
टीप:
१.दोन
मिनिटे तात्पुरते निलंबनाची वेळ खेळाडू अंगणात असताना लागू होईल.
२.
खेळाडू
दोन मिनिटं करिता तात्पुरता निलंबित झाल्यास तो जिवंत झाल्यानंतर निलंबित काळ सुरू
होईल.
३.
दोन
मिनिटे तात्पुरते निलंबित झालेल्या खेळाडू ऐवजी बाद झालेला खेळाडु जिवंत होऊ शकत नाही.
क.
लाल कार्ड:
सामन्यापुरते,
स्पर्धेत पुरते निलंबन/
बडतर्फ करणे.
जर खेळाडू,
प्रशिक्षक,
संघ
व्यवस्थापक, संघ
यांना पिवळे अगर लाल कार्ड दाखविल्यास त्या प्रत्येक क्रियेच्या वेळी विरुद्ध संघास
एक तांत्रिक गुण जाहीर करावा.
कबड्डी
खेळाची मुलभूत कौशल्ये (Skills in
Kabaddi)
कोणताही
खेळ हा कौशल्यांवर अवलंबून असतो. कबड्डी
हा ताकदवान, धडधाकट,
रांगड्या
लोकांचा खेळ असे जरी म्हटले जात असले तरी देखील कौशल्यांवरच आधारलेला आहे.
आक्रमक
किंवा चढाई पटुची कौशल्य व बचावात्मक कौशल्य अशा दोन प्रकारच्या कौशल्यांवर कबड्डी
हा खेळ आधारलेला आहे. त्याची
माहिती खालील प्रमाणे
आक्रमक
/ चढाई पटुची कौशल्य:
जेव्हा
एखाद्या संघातील खेळाडू प्रतिपक्षाच्या अंगणात जाऊन प्रतिपक्षाच्या बचाव करणाऱ्या खेळाडूंना
विविध युक्त्या योजून वेगवेगळ्या हालचाली, कृती
करून त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या त्या कृतींना,
हालचालींना
चढाई किंवा आक्रमण असे म्हणतात. चढाई
करणारा खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात जाऊन दम,
ताकद,
चपळता,
सराव
यांच्या जोरावर हात-पाय
याचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांना चुकवून गुण मिळविण्याचा जो आटोकाट प्रयत्न करतो त्यावर
त्याच्या कौशल्याचे अनेक प्रकार पडतात. त्यातील
काही प्रमुख प्रकार कौशल्य आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील.
१.
पायाने खेळाडू बाद करणे
(Toe Touch):
चढाई
करणारा खेळाडू प्रतिपक्षावर आक्रमण करुन त्यांना चुकवून आपल्या पायाने त्यांच्या पायाला
विविध प्रकारे स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो.
त्याच्या
या कौशल्याला पायाने खेळाडू बाद करणे (Toe Touch) असे
म्हणतात. चढाईच्या
वेळी एक खांदा मध्यरेषेकडे तर दुसरा खांदा प्रतिस्पर्धी संघाकडे असतो.
अशा
वेळी बचावात्मक संघातील खेळाडूंना हुलकावणी देऊन आपल्या पायाने बचावात्मक संघातील खेळाडूच्या
पायाला स्पर्श करावा. स्पर्श
करते वेळी आपले संपूर्ण शरीर मध्ये रेषेकडे झुकलेले असेल तर नजर संपूर्ण खेळाडूकडे
असून हात पुढील पवित्र्यात असतील. पायाने
खेळाडू कोठे, कसा
व केव्हा बाद केला यावरून त्याचे अनेक प्रकार पडतात ते खालील प्रमाणे
अ.
पळत
येऊन कोपऱ्यात बैठक घेऊन पाय मारणे
ब.
क्षेत्ररक्षण
हलवत असताना हूल देऊन बैठी न घेता पाय आत लांब करून मारणे.
क.
पळत
जाऊन पाय जमिनीबरोबर सरकवत कोपरा रक्षक मागे सरकत असताना त्याच्या हाताच्या खेळाडूस
पाय तिरपा करून पायावर मारणे
२.
लाथ मारून खेळाडू बाद करणे (Kicking)
कबड्डी
मध्ये लाथ मारून खेळाडू बाद करणे हे एक महत्त्वपूर्ण असे चढाई करणाऱ्याचे कौशल्य आहे.
चढाई
करणारा बचाव पटू वर अचानक हल्ला करण्यासाठी या कौशल्याचा उपयोग करतो.
जेव्हा
बचावपटू निदान रेषेवर संरक्षण करतात तेव्हा त्यांच्या बचावाविरुद्ध एक चांगले शस्त्र
म्हणून या कौशल्याचा उपयोग होतो. जेव्हा
बचाव पटूंची संख्या कमी असते तेव्हा प्रभावीपणे वापरणे साठी एक चांगले कौशल्य आहे.
लाथेने
गडी बाद करत असताना खालील काही गोष्टी लक्षात ठेवावयास हव्यात:
१.
लाथ मारताना खेळाडू एका
पायावर असतो त्यामुळे त्याचा तोल अस्थिर झालेला असतो त्यासाठी लाथ मारण्याची क्रिया
शक्य तेवढ्या सफाईने झटकन व्हावी.
२.
लाथ मारून पाय टाकत असताना
दोन्ही पाय एकमेकांजवळ येणार नाहीत याची काळजी घ्यावी अन्यथा पायावर सूर पडण्याची शक्यता
असते.
३.
लाथ मारत असताना शक्य
तेवढी पाठ कमी दाखवा पाठ दिसणे अपरिहार्य असले तरी तो काळ शक्य तितका कमी असावा.लाथेने
खेळाडू कोठे, कसा
व केव्हा बाद केला यावरून त्याचे अनेक प्रकार पडतात ते खालील प्रमाणे
अ.
बॅक
किक (Back
kick)
ब.
साईड
किक (Side kick)
क.
कर्व्ह
/ रोल किक (Curve/
Roll Kick)
३.
हाताने खेळाडू बाद करणे
(Hand Touch)
चढाई
करणारा खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात जाऊन स्वतःचा बचाव करतो व त्याचबरोबर विविध
प्रकारे आपल्या हाताने बचावात्मक संघातील खेळाडूंना स्पर्श करून बाद करण्याचा प्रयत्न
करतो त्यालाच हाताने खेळाडू बाद करणे (Hand Touch) असे
म्हणतात. हाताने
खेळाडू बाद करण्याचेखालील प्रमाणे प्रकार पडतात
अ.
रनिंग
हँण्ड टच(Running Hand Touch)
ब.
स्टूपिंग
हँण्ड टच (Stooping Hand Touch)
क.
साईडवर्ड
हँण्ड टच (Sideward Hand Touch)
बचाव
पटुची कौशल्य (Defender Skills)
चढाई
करणार्या खेळाडूचे आक्रमण परतवून
लावण्यासाठी चढाईपटूच्या चढाया हेरून त्याला पकडण्यासाठी ज्या विविध पद्धतीने पकडी
केल्या जातात त्यालाच बचावात्मक कौशल्य असे म्हणतात.
१.
चवढा/ घोटा पकडणे
(Ankle Hold):
चवढा/
घोट्या
वरील पकड कबड्डी मधील एक स्वतंत्र संरक्षण कौशल्य आहे.
चढाईपटू
च्या चढाईच्या वेळी बैठी मारणे आणि पायाच्या स्पर्शा विरुद्ध प्रतिस्पर्धी म्हणून बचाव
पटू खेळाडू या कौशल्याचा वापर करतात. संरक्षक
खेळाडू विशेषतः बोनस लाईनच्या खेळामध्ये या कौशल्याचा फायदा घेऊ शकतात कारण प्रत्येक
चढाई पटू कोपरा रक्षकाच्या बाजूने बोनस रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करीत असतो.
या
कौशल्याचा वापर करत असताना योग्य निरीक्षण, चढाई
पटू कडे झुकलेला शरीराचा पवित्रा, चढाई पटूच्या घोट्यावर
ठाम पकड आणि घोटा पकडल्यानंतर वर उचलून मागे ओढणे आणि चढाई पटुची दिशा बदलणे या क्रियांचा
समावेश आहे.

२.
पट काढणे/
मांडी पकडणे
(Thigh Hold):
चढाई पटू च्या मांडीला
पकडण्यासाठी आपण स्वतः एक पाऊल पुढे टाकून दोघातील अंतर कमी करावे.जो
पाय पुढे टाकला तोच हात पुढे काढून चढाई करणार्या
मांडीला विळखा घालणे व त्याच वेळी दुसऱ्या हाताने खेळाडूला अंतिम रेषेकडे ओढणे,मांडी
पकडुन खाली बसणे किंवा मांडी पकडून वर उचलणे,
खांद्याच्या
आधाराने चढाई करणाऱ्याला अंतिम रेषेकडे फिरवणे यापैकी कोणत्याही क्रिया खेळाडूला आपल्या
ताब्यात ठेवण्यास उपयोगी ठरतात. कोणत्याही
जागेवरचा बचाव पटू या कौशल्याचा उपयोग करू शकतो.
३.
गुडघा
पकडणे (Knee Hold):
चढाई
करणारा खेळाडू जेव्हा बचाव करणाऱ्या खेळाडूला बाद करण्यासाठी पायाने वेगवेगळ्या कृती
करतो किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो अशा वेळी त्याचा गुडघा आपल्या आटोक्यात
येत असेल त्यावेळेस आपण त्याच्या अधिक जवळ जाऊन आपला जो पाय पुढे येतो त्याच बाजूच्या
हाताने त्याच्या गुडघ्याला विळखा घालणे व दुसऱ्या हाताने मजबूत पकड करून गुडघा घट्ट
पकडून वर उचलणे, तसेच
अंतिम रेषेकडे वळविणे यालाच गुडघा पकडणे म्हणतात.
४.
कंबर पकडणे
(Waist or Trunk Hold):
चढाई
करणार्या खेळाडूस पाठीमागून
पकडण्यासाठी बचावपटू कंबर पकडणे या कौशल्याचा उपयोग करतात.
चढाई
करणारा खेळाडू पुढच्या खेळाडू वर आक्रमण करीत असेल अशा वेळी त्याची नजर चुकवून पाठीमागून
जाऊन दोन्ही हातांनी त्याच्या कमरेला विळखा घालून अंतिम रेषेकडे ढकलणे किंवा संपूर्ण
सामर्थ्यानिशी त्याला उचलून अंतिम रेषेकडे नेणे यालाच कंबर पकडणे म्हणतात.
५.
मनगट पकडणे
(Wrist Hold):
मनगट
पकडणे हे एक दुर्मिळ संरक्षण कौशल्य आहे. जेव्हा
चढाई पटू हळुवारपणे एका दिशेने हात विस्तारून बचाव पटूला बाद करण्याचा प्रयत्न करतो
अशा वेळी चढाईपटू वर या कौशल्याचा उपयोग केला जातो.
आज-काल
हे कौशल्य खूप दुर्मिळ पणे वापरले जाते यामागचे कारण असे आहे की पूर्वीचे खेळाडू वजनदार
होते त्यांच्या हालचाली खूप हळू होत्या आणि खेळाची शैली ही आजच्या खेळापेक्षा वेगळी
होती. आत्ताचे खेळाडू अधिक
चपळतेने त्वरित हालचालींचा उपयोग करतात. पदलालित्य
आणि चढाईच्या शैलीमध्ये ही अमुलाग्र बदल झाला आहे. चढाईपटू हा फक्त जलद
गतीने स्पर्श करण्यासाठी हात वाढवतो म्हणून बचाव पटूला मनगट पकडण्याची संधी क्वचितच
मिळते. जेव्हा चढाई पटू हाताने
खेळाडू बात करण्यासाठी कोपरा रक्षकावर खोलवर हात मारण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस
या कौशल्याचा वापर केला जातो.
६.
थोपवुन पकड करणे
(Blocking):
हे
कौशल्य कोपरा रक्षक व मध्य रक्षक या बचाव कडून घेराव करून वापरले जाते.
चढाई
करणार्या समोर भिंत उभारून
अडथळा निर्माण करून त्याच्या हालचाल थांबवणे म्हणजे थोपवून पकड करणे.
स्पॉट
ब्लॉकिंग (Spot Blocking), रनिंग
ब्लॉक (Running Block) आणि
फॉलोइंग ब्लॉक (Following Block) हे
थोपवून पकड करण्याचे प्रकार आहेत.
७.
साखळीत पकड करणे
(Chain Hold):
कबड्डी
मधील साखळीत पकड करणे हे एक प्रगत संरक्षण कौशल्य आहे.
यामध्ये
उंच व अवजड खेळाडूंना पकडण्यासाठी या कौशल्याचा वापर केला जातो.
साखळीत
पकड करणे या कौशल्यांमध्ये साखळी तयार करणे, चढाईपटूचा
मार्ग रोखणे, पकडल्यानंतर
पकड राखणे या क्रियांचा समावेश आहे. या
कौशल्याचे कोपरा रक्षक/ मध्य
रक्षक खेळाडूंकडून साखळीमध्ये पकड, पळताना
साखळीमध्ये पकड (Running Chain Hold) असे
प्रकार पडतात.
स्पर्धा आयोजनासाठी
आवश्यक साहित्याची यादी
कबड्डी
स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक साहित्याची यादी
(एका क्रीडांगणाकरिता)
|
क्र. |
विशेष
तयारी |
संख्या |
क्र. |
जनरल
तयारी |
|
१ |
सरपंच |
१ |
१ |
स्टेशनरी |
|
२ |
पंच |
२ |
|
पेपर |
|
३ |
गुणलेखक |
१ |
|
पेन |
|
४ |
सहाय्यक गुणलेखक |
२ |
|
फाइल्स |
|
५ |
वेळाधिकारी |
१ |
|
स्टेपलर आणि पिन |
|
६ |
तिसरी चढाई पंच |
१ |
|
पंचिंग मशीन |
|
७ |
स्टॉप वॉच |
१ |
|
|
|
८ |
Table stop
& go Clock |
२ |
२ |
साऊंड सिस्टिम |
|
९ |
इलेक्ट्रॉनिक वजनकाटा |
१ |
|
|
|
१० |
गुणपत्रक |
१ |
३ |
बैठक व्यवस्था |
|
११ |
शिट्टी |
३ |
|
पंच, खेळाडू, प्रेक्षक |
|
१२ |
गुणलेखक टेबल |
१ |
४ |
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था |
|
१३ |
वेळाधिकारी, गुणलेखक व तिसरी चढाई पंच साठी खुर्ची |
३ |
५ |
प्रथमोपचार पेटी |
|
१४ |
संघ मार्गदर्शकासाठी व व्यवस्थापकांसाठी खुर्ची |
४ |
|
|
|
१५ |
बाद खेळाडूंना
बसण्यासाठी बेंच/
खुर्ची |
- |
|
|
|
१६ |
फक्की |
- |
|
|
|
१७ |
मार्किंग टेप |
- |
|
|
|
१८ |
खडू बॉक्स |
- |
|
|
|
१९ |
गुण फलक |
१ |
|
|
संदर्भ:
Rao, E. P. (n.d.). Techniques in Kabaddi. Retrieved April 27,
2020, from http://www.kabaddirao.com/techniques.php
Dabholkar, N. (n.d.). Kabaddi . Retrieved April 25, 2020,
from https://sahitya.marathi.gov.in/scans/Kabaddi.pdf
Kabaddi. (n.d.). Retrieved April 26, 2020, from https://vishwakosh.marathi.gov.in/16684/
Retrieved April 27, 2020, from https://mr.wikipedia.org/wiki/कबड्डी
Retrieved April 26, 2020, from http://www.maharashtrakabaddi.com/
kabaddi. (n.d.). Retrieved April 27, 2020, from https://bharatdiscovery.org/india/कबड्डी Retrieved April 25, 2020, from
http://www.indiankabaddi.org/