हॅण्डबॉल (Handball)
डॉ.उमेशराज पदमराज पनेरू
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर
प्रस्तावना (History) :
जगभरात हॅण्डबॉल सांघिक खेळ म्हणून प्रचलीत आहे. युरोपियन खंडातमध्ये हा खेळ व्यावसायीक स्वरुपात खेळाला जातो तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान खेळ म्हणून प्रचलित आहे. या खेळाची फुटबाल, नेटबॉल, बास्केटबॉल व रग्बी या खेळांनशी समानता आढळुन येते, हॅण्डबॉल शारीरिक संपर्क येणारा खेळ असुन या मध्ये हाताचा जास्तीत जास्त वापर केला जातो म्हणून हाताचे कार्य महत्वाचे आहे (उदा: चेंडू फेकणे, पकडणे, खेळाडूस रोखणे इ. या क्रीया मध्ये हाताचा उपयोग जास्त प्रमाणात होतो), त्याचबरोबर हॅण्डबॉल खेळामध्ये खेळाडूं मध्ये निर्णय घेण्याची क्षमता असणे फार महत्वाचे आहे कारण हॅण्डबॉल खेळतांना शारीरिक संपर्क, जलदगतीने पळणे अथवा जलद हालचाली असल्याने प्रत्येकवेळेस प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मातकरण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात, विरुद्धसंघातील खेळाडूस हुलकावणी देऊन अथवा त्या पेक्षा गतीवान हालचाल करून अथवा धावून चेंडूवर ताबा मिळविणे अथवा गोल करणे महत्वाचे असते त्यामुळे खेळाडू हा शाररिक, मानसिक व भावनीक प्रकारे तंदुरुस्त असणे सुद्धा महत्वाचे आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करण्यासाठी संघातील खेळाडूंच्या साह्याने संघचे सामर्थ्य प्रकट करणे यातच स्वतःचे व संघाचे यश अवलंबून असते. हॅण्डबॉल खेळ जलद व शारीरिक संपर्क येणारा असल्याने प्रेक्षकांना हा खेळ पाहण्यास खूप आनंद उत्सूकता असते.
हॅण्डबॉल हा खेळ जगात विविध नावांनी प्रचलीत अथवा प्रख्यात आहे (उदा: हॅण्डबॉल,ऑलंपिक हॅण्डबॉल, टीम हॅण्डबॉल, युरोपियन हॅण्डबॉल, फिल्ड हॅण्डबॉल इ.) हा खेळ (Indoor) बंदिस्थ जागेत व मैदानावर (Outdoor) अथवा समुद्र किनारच्या मातीवर (Beach) वर खेळला जातो. खेळाचा मुख्य उद्देश प्रतिस्पर्धी खेळाडूच्या गोल मध्ये चेंडु फेकून गोल करणे होय. हॅण्डबॉल खेळाचा खेळाडूंचा संघ हा १६ जणांचा असतो पण प्रतेक्ष्यात मैदानात ७ (सात) खेळाडू खेळतात या मध्ये ६ मैदानी खेळाडू (Court Players) व १ गोल रक्षक (Goal Keeper), जो संघ गोल मारण्यासाठी जातो त्या संघास आक्रमण (Attacker) करणारा संघ म्हणतात तर जो संघ गोल करण्यासाठी आलेल्या खेळाडूंना रोखतो त्या संघास बचाव करणारा संघ (Defender) म्हणतात या खेळामध्ये शारीरिक संपर्क असल्याने खेळ हा नियमांच्या साच्यामध्ये बसवलेला आहे. या खेळा मध्ये जास्तीत जास्त ६ मी. रेषा व ९ मी. रेषेच्या मध्ये आक्रमण व बचावच्या हालचाली होतातात. आंतर राष्ट्रीय हॅण्डबॉल फेडरेशन International Handball Fedration (IHF) या संस्थेच्या माध्यमातून हॅण्डबॉल खेळावर प्रशासकीय नियंत्रण राखले जाते व या संथेच्या नियंत्रणाखाली आंतर राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन व नियोजन केले जाते सध्यास्थितीत या संघटनेचे २०९ देश सदस्य आहेत. आंतर राष्ट्रीय हॅण्डबॉल फेडरेशन कार्यभार (IHF) व्यवस्थापण योग्य प्रकारे व्हावे या द्रुष्टीने आफ्रिका, आशिया, युरोप, उत्तर अमेरिका व कॅरी बीयीन, ऑक्सिनें आणी दक्षिण व मध्य अमेरिका अशी विभागणी केलेली आहे. जगभरात साधारणतः ३१ मिलेनियम पेक्षा जास्त खेळाडु, मार्गदर्शक व पंच सध्या स्थितीत कार्यरत आहेत.
(Handball History):
१. आंतरराष्ट्रीय इतिहास (International History) :
हॅण्डबॉल खेळाच्या उत्पत्ति बद्दल वेगवेगळ्या राष्ट्राचे वेगवेगळे विचारप्रवाह अथवा दावे आहेत. प्राचीन काळामध्ये ग्रीक मध्ये युरानिया (Urania), रोम मध्ये हरपास्टन्स (Harpastans) मध्ययुरोप मध्ये कॅचबॉल (Catchall) नावाने प्रचलित होता. सोळाव्या शतकामध्ये व अठराव्या शतकामध्ये ग्रीनलंड (Greenland) मध्ये हॅण्डबॉल खेलाजायाचा असे संबोधले आहे, परंतु खेळाला नियमाच्या चौकटी मध्ये बसवलेले नव्हते. एकोणावीसाव्या शतकामध्ये हॅण्डबॉल खेळास खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. १८९७ मध्ये डेन्मार्क (Denmark) नायबॉग (Nyberg) या ठिकाणी हझाना (Hazana), चेक रेपौब्लिक (Cheque Republic) व युक्रेन (Ukraine) मध्ये हॅण्डबोल (Handboll) व जर्मनी मध्ये टोरबॉल (Torball) नावाने खेळला जायचा. डेनमार्क, जर्मनी व स्वीडेन खऱ्या अर्थाने आधुनिक हॅण्डबॉल खेळाचे उत्पत्तीकारक देश आहेत असे म्हणावे लागेल व आधुनिक हॅण्डबॉल खेळाचा जनक म्हणून जर्मन जिमनास्टिक शिक्षक कोनरालड कोच (Konrad Koch) यांना म्हणावे लागेल, कोनरालड कोच यांनी हॅण्डबॉल खेळाला नियमांच्या साच्यामध्ये बसविले. १९०६ मध्ये डॉनिष जिमनास्टिक टीचर लेफ्टनंट (Lieeutenant) व ऑलंपिक मेडलिस्ट होल्गर नियलसन ऑडरिप (Holger Nelson Odrup) यांनी ग्रामर स्कुल, उत्तर कोपेहेजन (North of Copenhagen) येथे हॅण्डबॉल खेळ फुटबॉल च्या मैदानावर खेळण्यास सुरवात केली व आधुनिक हॅण्डबॉल खेळाचे नियम २९ ऑक्टोबर १९१७ मध्ये म्याक्स हेईसेर (Max Heiser), कार्ल स्चेलेन्झ (Karl Schelenz) व एरीच कोनिघ (Erich Konigh) यांनी बर्लिन (Berlin) या ठिकाणी प्रसिध्द केले, हा दिवस हॅण्डबॉल खेळाच्या उत्पत्ती चा दिवस ठरला व प्रसिद्ध नियमाचा आधार घेऊन हॅण्डबॉल खेळाचा पहिला सामना २ डीसेंबर १९१७ रोजी बर्लिन (Berlin) या ठिकाणी खेळविण्यात आला त्यानंतर १९१९ मध्ये कार्ल स्चेलेन्झ (Karl Schelenz) यांनी हॅण्डबॉल खेळाच्या नियमामध्ये सुधारणा केल्या, १९२५ मध्ये हॅण्डबॉल खेळाच्या सुधारित नियमाच्या आधारे पहिला पुरुषांचा अंतरराष्ट्रीय सामना जर्मनी व बेल्जियम या संघांमध्ये खेळविण्यात आला.
१९२६ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑमीचुअर ऑथलेटीक्स फेडरेसनची सभा हगुये (Hague) नेदरल्यांड (Netherland) या ठिकाणी पार पडली या सभे मध्ये हॅण्डबॉल खेळाची आंतर राष्ट्रीय नियमवाली अध्यावत करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने हॅण्डबॉल खेळाचे नियम अध्यावत करून प्रसिद्ध करण्यात आले व १९२८ मध्ये इंटरनॅशनल अॅमच्युअर हॅण्डबॉल फेडरेशनची स्थापना ऑमस्टरडॅम (Amsterdam) या ठिकाणी ९ व्या ऑलंपिक स्पर्धा दरम्यान करण्यात आली या सुधारित नियमांच्या आधारे १९३० मध्ये जर्मनी व ऑस्ट्रिया महिलांच्या संघांमध्ये महिलांचा पहिला आंतर राष्ट्रीय सामना खेळविण्यात आला तसेच १९३० ऑलंपिक कॉंग्रेस मध्ये हॅण्डबॉल खेळाचा ऑलंपिक स्पर्धानमध्ये समावेश करून घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला व सर्व देशांच्या प्रतिनिधीनी या प्रस्तावाला मान्यता दिली, १९३६ च्या ११ व्या बर्लीन (Berlin) ऑलम्पिक स्पर्धांमध्ये सर्वानुमते पुरुषांच्या स्पर्धांचा समावेश करण्यासाठी अनुमती देण्यात आली. १९३४ पर्यंत २५ देशांनी इंटरनॅशनल अॅमच्युअर हॅण्डबॉल फेडरेशनचे सदस्यत्व स्वीकारले. १९३६ अकराव्या (११ व्या) बर्लीन (Berlin) ऑलंपिक स्पर्धेमध्ये टीम हॅण्डबॉल खेळाचा ऑलंपिक स्पर्धेत फुटबॉलच्या मैदानावर ११ खेळाडूंसह सामने खेळविण्यात आले व अंतिम सामना जर्मनी व ऑस्ट्रिया या संघांमध्ये झाला, या सामन्यामध्ये जर्मनी संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा १०:०६ असा ४ गोल ने पराभव केला. दुसऱ्या जागतिक युद्धानंतर १८ जुलै १९४६ मध्ये डेन्मार्कची राजधानी कोफेगण (Copenhagen) या ठिकाणी आठ राष्ट्र (डेन्मार्क, इंग्लंड, फ्रांस, नेदरलँड, नॉर्वे, पोलांड व स्विझर्लांड) एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉल फेडरेशन (International Handball Federation) ची स्थापना नव्याने करण्यात आली. १९४९ मध्ये ४४ व्या ऑलंपिक कॉंग्रेस रोम (Rome), १९५२ च्या ऑलंपिक स्पर्धा हॅण्डबॉल खेळाचा प्रात्येक्षिक (Demo) देण्यात आले परंतु प्रस्ताव नाकारण्यात आला, १९५६ साली हॅण्डबॉल खेळाच्या नियमान मध्ये सुधारणा करण्यात आले, १९६५ साली, ६५ व्या ऑलंपिक कॉंग्रेस मॅद्रीद (Madrid) या टिकाणी ऑलिंपिक कमिटीने ऑलिंपिक स्पर्धेत २१ खेळांचा समावेश करण्याची शिफारस केली व आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉल फेडरेशन (International Handball Federation) ने हॅण्डबॉल खेळाच्या नियमांमध्ये व मैदानामध्ये बदल करून व १९७२ च्या म्यूनिक (Munich) ऑलिंपिक स्पर्धेत सेवन साइड (७ अ साईड) हॅण्डबॉल खेळाचा समावेश ऑलिंपिक स्पर्धांमध्ये करण्यात आला तसेच १९७६ च्या मोणटेरल (Montreal) ऑलंपिक मध्ये महिलाच्या हॅण्डबॉल खेळाचा समावेश आज पर्यंत करण्यात आला.
राष्ट्रीय (भारतातील) इतिहास (Indian History) :
हॅण्डबॉल खेळाची सुरुवात भारतामध्ये १९७२ साली, क्रीडा शिक्षक श्री.जगतसिंग चौहान यांनी रोहतक (हरियाणा) या ठिकाणी केली, हॅण्डबॉल खेळाचे भारतातील जनक म्हणून शिक्षक श्री.जगतसिंग चौहान यांना ओळखले जाते व श्री. जगतसिंग चौहान हे भारतीय हॅण्डबॉल फेडरेशन (Indian Handball Federation) चे पहिले सचिव होते. हॅण्डबॉल फेडरेशनचे प्रथमतः आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश , हरियाणा, महाराष्ट्र (विदर्भ) व जम्मू व काश्मीर हे राज्य सदस्य होते. भारतामध्ये हॅण्डबॉल खेळाची पहिली राट्रीय स्पर्धा ह्या १९७२ मध्ये रोहतक या ठिकाणी पार पडल्या पुरुषाच्या गटामध्ये हरियाणा राज्याच्या संघाने प्रथम क्रमांक पटकवले तर दुसरा क्रमांक आन्ध्र प्रदेशाने पटकावले महिलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक हे महाराष्ट्र संघाने तर दुसरा क्रमांक हरियाणा संघाने पटकावला. १९७३ मध्ये श्री. जगतसिंग चौहान हे हॅण्डबॉल फेडरेशन चे सचिव कायम राहु शाकले नाही, त्यांच्या एवजी श्री. एल.एम.खान यांची भारतीय हॅण्डबॉल फेडरेशनचे सचिव व सौ. लक्ष्मि चाबाला यांची अध्यक्ष म्हणून हैद्राबाद या ठिकाणी पार भारतीय हॅण्डबॉल फेडरेशनच्या सभेमध्ये निवड झाली. त्याच वर्षी १९७३ साली राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्र (पुणे) या ठिकाणी संपन्न झाल्या या मध्ये पुरुषामध्ये पंजाब व बिहार या संघाने अनुक्रमे प्रथम व द्वीतिय क्रमांक प्राप्त केला तर महिलांमध्ये पंजाब व आन्ध्र प्रदेश संघांनी प्रथम व द्वितीय स्थान प्राप्त केला तसेच १९७३ पासून आज पर्यंत एन.आ.एस.सेंटर ठिकाणी हॅण्डबॉल खेळाचे सहा आठवड्याचे प्रमाण पत्र कोर्स चालू आहे. १९७६ मध्ये हॅण्डबॉल फेडरेशन ची निवडणूक नागपूर (महाराष्ट्र) या ठिकाणी संपन्न झाली व श्री.एम.एल.खान यांची सचिव व एच.एल.कपूर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. १९७६ मध्ये भारतीय हॅण्डबॉल फेडरेशन ने आशियायी हॅण्डबॉल फेडरेशनची संलग्नीकरण मिळाले व याच वर्षी खेळाच्या मैदानामध्ये बदल झाले. हॅण्डबॉल २० x ४० मी. च्या मैदानावर खेळण्यास सुरुवात झाली.
१९७९ साली पुरुषांच्या राष्ट्रीय स्पर्धा पंजाब (लुधियाना) या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या या स्पर्धा मधून चीन येथील दुसऱ्या आशियाई हॅण्डबॉल स्पर्धांसाठी भारतीय संघ निवडण्यात आला व संघ स्पर्धेत सहभागी झाला, सदरच्या संघाचा दहा (१०) दिवसाचा सराव शिबीर हा जम्मू या ठिकाणी पार पडला.
१९७९-८० मध्ये नागपूर या ठिकाणी पहिल्यानदा अखिल भारतीय अंतर विद्यापीठ हॅण्डबॉल स्पर्धाना सुरुवात झाली या मध्ये नागपूर विद्यापीठाने प्रथम क्रमांक, पंजाबी विद्यापीठ, पंजाब संघाने दुसरा क्रमांक, उस्मानिया विद्यापीठाने तृतीय क्रमांक व कुरुक्षेत्र विद्यापीठाने चतुर्थ क्रमांक संपादन केला. महिलांच्या स्पर्धांमध्ये नागपूर विद्यापीठ, नागपूर, पंजाबी विद्यापीठ, पंजाब द्वितीय तर मुंबई विद्यापीठ तृतीय क्रमांक संपादन केला. १९८१ मध्ये भारतीय मागदर्शक व पंचांसाठी नागपूर या ठिकाणी श्री. फ्रीच्क इलाइंस () यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सेमिनार घेण्यात आला. १९८१ साली श्रीनगर (जम्मू व काश्मीर) या ठिकाणी पहिल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धा आयोजन करण्यात आले व त्या पस्यात हॅण्डबॉल प्रत्येक गावा मध्ये व शहरा मध्ये खेळला जाऊ लागला.
१९८२ दिल्ली आशियायी क्रीडा स्पर्धेत हॅण्डबॉल खेळाचा समावेश करण्यात आला व या स्पर्धेत भारतीय संघाने नेत्रदीपक कामगिरी केली. आशियायी क्रीडा स्पर्धांनपासून हॅण्डबॉल खेळाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होत गेला व जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर देशामध्ये स्पर्धानंचे आयोजन करण्यात आले. हॅण्डबॉल खेळाचा समावेश पोलीस, बी.एस.एफ, सी.आर.पी.फ., सी.एइ.सीएफ, इंडिअन रेल, सेना दलात (सर्विसेस), कस्टम डीपार्टमेंट, इन्कम टॅक्स व इ. विभागात विविध स्थरावर खेळण्यास सुरुवात झाली त्याच प्रमाणे साई सेंटर व राष्ट्रीय हॅण्डबॉल अकॅडेमी ची स्थापना करण्य्यात आली यातून गुणी खेळाडूना प्रशिकशण देऊन खेळाडू तयार होऊ लागले.
१९८३ पासून एन.आ.एस.सेंटर पतियाला या ठिकाणी रेगुलर डिप्लोमा कोर्स चालू करण्यात आले व विविध जिल्हा हॅण्डबॉल खेळाच्या सेंटर निर्माण झाले व खेळाचा प्रसार व प्रचार झाल्या मुळे खेळास चांगले दिवस आले.
१९८५ साली हॅण्डबॉल फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक लुधियाना(पंजाब) या ठिकाणी पार पडली या निवडणुकीमध्ये श्री.एस.एम.बाली यांची सचिव म्हणूनं निवड झाली व पद्मश्री डॉ. आर.एल.आनंद यांची अद्यक्ष म्हणून निवड झाली. या दोघांच्या नेत्तृत्व व मागदर्शनखाली हॅण्डबॉल फेडरेशन ऑफ इंडिया ने विविध आंतर राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन व नियोजन करण्यात आले त्याच बरोबर विविध राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्य्यात आले हॅण्डबॉल च्या खेळाडूंना उत्कृष्ट्र सुविधा व प्लात्फोर्म उपलब्ध करून दिला. २०१४ पासून डॉ.रमा सुब्रामनी व श्री. आनंदेश्वर पांडे यांनी आजपर्यंत अध्याक्ष्य व सचिव म्हणून काम करत आहेत व खेळाडूना चांगल्या सोई व सुविधा तसेंच खेळाचा प्रचार व प्रसार करत आहेत.
नियम क्र १ : खेळाचे मैदान (Playing Court):
हॅण्डबॉल खेळाच्या मैदानाची मोजमापे (Ground Measurements)
अ. हॅण्डबॉल खेळाचे क्रीडांगण आयताकृती, ४० मी. लांबीचे व २० मी. रुंदीचे असते. क्रीडांगणाचे मध्य रेषेच्या सहाय्याने दोन (२० मी.) च्या समान भागात विभागणी केलेले आहे. त्या भागाला आंगण (Court) असे म्हणतात. क्रीडांगणाच्या ४० मी. लांबीच्या रेषेला साईड लाईन (Side Line) व २० मी रुंदीच्या रेषेला गोल लाईन (Goal Line) असे म्हणतात. सुरक्षतेच्या दृष्टीने क्रीडागणाच्या साइड लाइन पासून १ मी. आणी गोल लाईन पासुन २ मी. जागा राखीव ठेवावी या जागेला सेफझोन (Safe zone) असे म्हणतात.
हॅण्डबॉल खेळाचे मैदान(मोज मापे हे सेंटीमीमीटर मध्ये दर्शविले आहेत)
१. ४० मी. साइड लाईन (Side Line) : मैदानाच्या दोन्ही बाजूच्या सीमा निश्चित करणारया उभ्या रेषेला साईड लाईन म्हणतात.
२. २० मी. गोल लाईन (Goal Line) : मैदानाच्या दोन्ही बाजूच्या रुंदीची आडवी सिमा निश्चित करणा –या रेषेला गोल लाईन म्हणतात
३. ४ मी. गोल रक्षक प्रतिबंधीत रेषा (Goal keeper Restricted Area) : गोल लाईन च्या मध्य वरून समोरच्या बाजूस गोल लाईन एरिया मध्ये ४ मी. अंतरावर ५ सेंनटीमीटर जाडीची १५ सेंटीमीटरची गोल रेषेला समांतर रेषा असते. पेनाल्टी च्या वेळी गोल रक्षक त्या रेषेच्या पुढे गोल रोखण्या साठी येवू शकत नाही.
४. ६ मी. गोल एरिया लाईन (Goal Area Line) : गोल रेषेच्या मध्य भाग म्हणजे १० मी. वर दोन्ही बाजूस (उजवी कडे व डावी कडे) दोन बिंदू मार्क करून या बिन्दुवरून ६ मी. त्रीजेची दोन चतकोर वर्तुळ काढून त्यानंतर त्या मधील ३ मी. आंतर जोडावे .
५. ७ मी. पेनाल्टी रेषा (7 Meter Penalty Line) : गोल एरिया रेषेच्या १ मी. पुढे म्हणजेच गोल रेषेला सामन्तर व गोल रेषेच्या पुढील बाजूस ७ मी. अंतरावर १मी. लांबीची व ५ सें.मी. जाडीची रेषेला पेनाल्टी रेषा असे संबोधले जाते.
६. ९ मी. फ्री थ्रो रेषा (Free Throw Line) : गोल एरिया रेषे प्रमाणे सदरची रेषा दोन चतकोर वर्तुळ काढून त्यानंतर त्या मधील ३ मी. आंतर जोडावे लागते. सदरची रेषा आखताना ती तुटक तुटक (म्हणजेच १५ सेंटीमीटर ची रेषा व १५ सेंटीमीटर सोडून पुन्हा १५ सेंटीमीटर) म्हणजेच दोन आखल्या १५ सें.मी. च्या रेषांमध्ये १५ सेंनटीमीटर चे अंतर सोडलेले असते.
७. २० मी. मध्य रेषा (Centre Line) : दोन्ही साइड रेषासच्या २० मी. अंतरावर (मेध्यावर) गोल रेषेस समांतर असणाऱ्यां रेषेला मध्य रेषा म्हणतात या रेषेमुळे मैदानाचे दोन समान भाग होतात.
८. ४.५० मी. खेळाडु बदली रेषा (Substitution Line) : मध्य रेषेपासून मैदानाच्या दोन्ही साईड लाईन वर डावीकडे व उजवीकडे ४.५ मी. अंतरावर मैदानात १५ सें.मी. व मैदाना बाहेर १५ सें.मी गोल लाईन ला समांतर असणाऱ्या रेषेला खेळाडु बदली रेषा म्हणतात.
खेळाडु बदली रेषा (Substitution Line)
९. गोलपोस्ट (Goal Post) : मैदानाच्या दोन्ही बाजूला गोल रेषेवर मध्यभागी गोल पोस्टची चौकट उभे असते, चौकटीचा उभाखांब हा २ मी. उंचीचा व त्यांना जोडणारा आडवाखांब ३ मी. रुंदीचा असून दोन खांबातील अंतर आतल्या किनाऱ्या पासून मोजल्यास ३ मी. असते प्रत्येक खांबाचा छेद चौरस ८ x ८ सेंटिमीटरचे असून खांब हा लाकडी, हलका धातूचा अथवा कृत्रिम पदार्थ ने बनवलेला असतो. गोलपोस्ट हा २० सेंटीमीटर विरुद्ध रंगाने म्हणजेच रंगवलेले असतो. गोलपोस्ट च्या चौकटीचा कोपरा हा २८ सेंटीमीटर एकाच रंगाने रंगविलेला असतो. गोलपोस्ट च्या मागे कमीत कमी एक मी. अंतरावर जाळीलावलेली असावी.
गोलपोस्ट (Goal Post)
नियम क्र ०२ : खेळाच्या सामन्याची कालावधी (Playing Time, Final Signal and Time-out)
अ. सामन्याचा कालावधी :
अ.न वयोगट खेळाडु अवधी विश्रांती
१. ८ वर्षा खालील मुले व मुली २ X १० मी. ते १५ मी. १० मी.
२. ८ ते १२ वर्षाच्या मुले व मुली २ X २० मी. १० मी.
३. १२ ते १६ वर्षाच्या मुले व मुली २ X २५ मी. १० मी.
४. १६ वर्षाच्या वरील मुले व मुली २ X ३० मी. १० मी.
मध्यंतरानंतर दोन्ही संघाना मैदानाच्या बाजु बदलावी लागते.
सामना बरोबरीत सुटला तर अतिरिक्त वेळ (Extra Time)
५. पहिली अतिरिक्त वेळ ५-५ मी. १ मी.
६. दुसरी अतिरिक्त वेळ ५-५ मी. १ मी.
७. अतिरिक्त वेळे नंतर सामना बरोबरीत सुटला तर पेनल्टी शुट आउट (Penalty Shoot)
८. पहिल्या पेनल्टी शूट आउट दरम्यान सामना पुन्हा बरोबरीत सुटला तर सामन्याचा निकाल
लागे पर्यंत ५ - ५ पेनल्टी मारण्याची संधी दोन्ही संघास दिले जातात.
ब. Final Signal
१. पंचांच्या शिट्टीच्या इशाऱ्याने थ्रो-ऑफ घेऊन सामन्यास सुरु होतो व वेळाधिकारी अथवा पब्लिक घड्याळच्या आवाजाने सामना समाप्त होतो. पब्लिक घड्याळ नसेल तर पंच, वेळाधिकारी अथवा डेलिगेट शिट्टीच्या इशारा देऊन सामना समाप्तीचा इशारा देतो.
क. टाइम आउट (Time-out) :
पंच खेळामध्ये टाइम आउट कधी घ्यावयाचा निश्चित करतो, टाइम आउट कधी अनिवार्य असतो
१. खेळाडूला ताकीद, २ मी. शिक्षा अथवा सामन्यासाठी अपात्र ठरविल्यावर
२. वेळाधिकारी, गुण लेखक अथवा टेकनिकल डेलीगेट ने इशारा दिल्यावर
३. दोन्ही पंचांमध्ये संभाषण अथवा विचार विनिमय करण्यास
४. संघाचे तीन टीम टाईम आउट: प्रत्येक संघास सामन्या दरम्यान प्रत्येक सत्रा मध्ये १ मी. टाईम आउट घेता येतो परंतु अतिरिक्त वेळेत टाईम आउट घेता येत नाही.
सामन्या दरम्यान सामन्याच्या परिस्थीनुसार आवश्यकेतेनुसार टाईम आउट दिला जातो
नियम क्र ०३ : चेंडू (The Ball) :
अ. हॅण्डबॉल खेळाचा चेंडू हा चर्म अथवा कृत्रिम धातूचा असतो . चेंडू हा गोलाकार असतो. चेंडूचा भाग हा चमकणारा (Shiny) व सटकनारा (Slippery ) नसावा.
ब. चेडूचा आकार:
अ.नं वयोगट खेळाडु चेंडूचा आकार वजन परीघ
१. ८ वर्षा खालील मुले व मुली ० नंबर २९० ग्रॅम ४८ सें.मी
२. ८ ते १२ वर्षाच्या मुले १ नंबर ३२५–३७५ ग्रॅम ५४ ते ५६ सें.मी
८ ते १४ वर्षाच्या मुली १ नंबर ३२५–३७५ ग्रॅम ५४ ते ५६ सें.मी
३. १२ ते १६ वर्षाच्या मुले २ नंबर ३२५–३७५ ग्रॅम ५४ ते ५६ सें.मी
४. १४ वर्षाच्या वरील मुली व महिला २ नंबर ३२५–३७५ ग्रॅम ५४ ते ५६ सें.मी
५. १६ वर्षाच्या वरील मुले व मुली ३ नंबर ४२५–४७५ ग्रॅम ५८ ते ६० सें.मी
क. सामान्य दरम्यान प्रत्येक मैदानावर कमीत कमी २ (दोन) चेंडू असावेत.
ड. राखीव चेंडू केव्हा वापरावा हे मैदानी पंचाने ठरवितो व चेंडू बाहेर गेल्यास टाइम आउट न घेता राखीव चेंडू वापरून सामना पुन्हा सुरु करावा.
नियम क्र ०४ : संघ, खेळाडु बदल, साहित्य व खेळाडूची दुखापत
(The Team, Substitutions, Equipment, Player Injury)
अ. संघ (The Team) :
१. हॅण्डबॉल खेळाचासंघ १६ खेळाडूंचा असतो सामना दरम्यान गुणपत्रकावर १४ खेळाडूंची नवे असावीत त्या पैकी सात (७) खेळाडु (६ मैदानी खेळाडु व १ गोल रक्षक) हे प्रतेक्ष्यात मैदानात खेळतात व उर्वरित ९ खेळाडु हे राखीव खेळाडु म्हणून मैदानाच्या बाहेर खेळाडुबदली भागात बसलेले असावेत.
२. सामना सुरु होण्यासाठी कमीत कमी ५ खेळाडु मैदानात असणे बंधन कारक आहे. सामन्या दरम्यान ५ खेळाडू पेक्षा कमी खेळाडू मैदानात झाल्यास सामना चालू ठेवावा, मैदानी पंच कुठे व केव्हा सामना संपवायचा हे ठरवते.
३. सामान्याच्या वेळी संघासोबत जास्तीत जास्त ४ (चार) संघव्यवस्थापक असावेत पैकी एकाची जबाबदार व्यक्ती म्हणून नेमणूक असावी.
ब. खेळाडु बदल (Substitutions) :
१. सामान्य दरम्यान खेळाडु गुणलेखकाला अथवा वेळाधीकारयाला समज न देता केव्हाही बदली बदलू शकतो, हा नियम गोल रक्षकाला सुद्धा लागु असतो, खेळाडु अदलाबदल करतांना त्यांनी तांच्या खेळाडुबदली भागातूनच (Substitutions Area) बदल करणे अनिवार्य असते. मैदानात खेळत असलेला खेळाडु प्रथम बाहेर आल्यानंतरच बाहेरील खेळाडु मैदानात प्रवेश करू शकतो.
२. खेळाडु बदलीचा नियम हा ऑफिसिलयल टाइम आउट असतांनाही लागु असतो पण टीम टाइम आउट असतांना हा नियम लागु नाही.
चुकीचा खेळाडु बदल केल्यास (Wrong Substitutions):
१. चुकीच्या पद्धतीने खेळाडु आदला बदल केल्यास ज्या खेळाडूने चुकी केली त्यास २ मी. साठी चालू सामन्यातून निलंबित केले जाते, एकाहून अधिक खेळाडूने एकाच वेळेस चुकीच्या पद्धतीने खेळाडु बदल्यास ज्या खेळाडूने पहिल्यानदा चुकी केले आहे त्यास २ मी. निलंबित केले जाते व विरुद्ध संघास फ्री थ्रो दिला देऊन सामना पुन्हा सुरु केला जातो.
२. सामना चालू असताना मैदानात खेळणाऱ्या सात खेळाडूनपेक्षा अतिरिक्त खेळाडु बेकायदेशीर मैदानात प्रवेश केला असता अथवा निलंबित खेळाडूने जाणून बुझून निलंबनाची वेळ समाप्त होण्याआधी मैदानात दाखल झाल्यास त्या संघाती एका खेळाडूस २ मी. साठी सामन्यातून निलंबित करावे, दोन्ही केसस मध्ये विरुद्ध संघातील फ्री थ्रो देऊन पुन्हा सामना सुरु करावा.
क. साहित्य (Equipment) :
१. संघातील खेळाडूंचा गणवेश हा एकसारखा असावा, गणवेशचा रंग अथवा नक्षीकाम ही एक मेकांपेक्षा वेगळी असावेत परंतु गोलरक्षकाचा गणवेश ओळखु येण्यासाठी वेगळा असावा.
२. खेळाडूंच्या पाठी वर असलेल्या नंबरची उंची २० सें.मी असावी व पुढली नंबर ची उंची १० सें.मी असावी. नंबर हे १ ते ९९ पर्यंत व नंबर चा कलर हा गणवेशापेक्षा वेगळा असावा.
३. खेळाडूने सामान्यादरम्यान बूट (Shoe) घालणे बंधन कारक आहे. सामान्या दरम्यान ऑबजेकटनी खेळाडूना इजा होवु शकते अथवा अपघात होवु शकतात अश्या वस्तू वापरणे प्रतिबंधीत आहे. (उदा. हेड गारड, मास्क, चेन, रिंग इ.) मऊ (soft) लवचिक साहित्य (Elastic Material) वापरण्यास परवानगी आहे. जर प्रतिबंधक ऑबजेकट खेळाडूने परिधान केले असतील तर त्याने ते काढे पर्यंत मैदानात प्रवेश करता येत नाही व खेळता येत नाही.
ड. खेळाडूची दुखापत (Player Injury) :
१. खेळाडूच्या शरिरातून रक्त प्रवाह होत असेल अथवा गणवेशावर रक्त असेल तर जेव्हा पर्यत रक्त प्रवाह थांबत नाही अथवा त्यावर मलमपट्टी होत नाही तो पर्यंत खेळाडूस मैदानात प्रवेश अथवा खेळता येत नाही.
२. खेळाडु जखमी झाल्यावर पंचानी टाइम आउट दिल्यावर व पंचानी संघ व्यवस्थापकांना मैदानात येण्याचा इशारा दिल्यानंतरच संघातील दोन व्यक्तींनी जखमी खेळाडूला मदत करण्यासाठी मैदानात प्रवेश करावा.दोन पेक्षा अधिक व्यक्तीनी मैदानात प्रवेश केल्यास बेकायदेशीर प्रवेश म्हणून संघास शिक्षा मिळते.
नियम क्र ५ : गोल रक्षक (Goal Keeper) :
गोल रक्षक पुढील बाबी करण्यास परवानगी आहे.
१. गोल एरिया मध्ये असतांना शरीराच्या कोणत्याही भागाने चेंडूस स्पर्श करू शकतो व चेडूसह गोल एरिया मध्ये कुठेही जावू शकतो, गोल रक्षक गोल एरियाच्या बाहेर चेंडूचा ताबा त्याकडे नसतांना येऊ शकतो व मैदानात कोर्ट प्लेएर म्हणून खेळु शकतो मात्र अश्या वेळेस त्यास मैदानी खेळाडूंचे (कोर्ट प्लेएर) सर्व नियम लागु असतात .
२. गोल रक्षक बॉल वर ताबा मिळवितांना अनियंत्रित स्थितीमध्ये असेल तर चेंडूसह गोल एरिया सोडू शकतो व पुन्हा प्लेइग एरिया मध्ये खेळु शकतो.
गोल रक्षकास पुढील बाबी करण्यास परवानगी नाही.
१. गोल रक्षक बचाव करण्याच्या पवित्र्यात असेल तर विरुध्द संघातील खेळाडूस धोका होईल असे कृत्य करू शकत नाही, चेंडूसह गोल एरियाच्या बाहेर येवू शकत नाही, जर गोल एरियाच्या बाहेर आला तर विरुद्ध संघास फ्री-थ्रो दिला जातो.
२. गोल रक्षक गोल एरियामध्ये असतांना कोर्टमध्ये असलेला स्थिर स्थिथीतील चेंडू, घरंगळत जाणाऱ्या चेंडूस स्पर्श अथवा पकडू शकत नाही तसेच गोल एरिया बाहेरील चेंडू तो गोल एरियात घेऊन जाऊ शकत नाही, प्लेइग एरिया मध्ये असतांना गूढघ्या खालील भागाने चेंडूला स्पर्श करू शकत नाही.
३. पेनल्टी शुट आउट च्या वेळेस तो ४ मी. रेषा (गोल कीपर अंतिम रेसच्या) पुढे गोल रोखण्या साठी येऊ नाही.
नियम क्र ६: गोल एरिया (Goal Area) :
अ. गोल एरिया मध्ये फक्त गोल रक्षकास प्रवेश करण्याची परवानगी असते. गोल एरिया मध्ये गोल एरिया लाइन चा समावेश असतो.
ब. मैदानातील खेळाडु (कोर्ट प्लेअर) ने गोल एरिया मध्ये प्रवेश केल्यास खालील निर्णय दिले जातात. (गोल कीपर थ्रो, फ्री थ्रो, ७ मी. थ्रो- पेनाल्टी)
क. गोल एरिया मध्ये प्रवेश केल्यास केव्हा दंड मिळत नाही.
१. विरुद्ध संघाच्या खेळाडूस कोणताही अडथळा अथवा फायदा न घेता खेळण्याची क्रीया पूर्ण झाल्यानंतर तो गोल एरियात प्रवेश करू शकतो.
२. संघास कोणताही फायदा न घेता चेंडू ताब्यात नसतांना गोल एरियात प्रवेश करू शकतो.
ड. गोल एरियामध्ये गोल रक्षकाने चेंडू नियनंत्रित केल्यास चेंडू खेळाच्या बाहेर असल्याचे मानले जाते व सामन्ययास गोल रक्षक थ्रो ने पुन्हा सुरुवात केली जाते.
नियम क्र ७ : चेंडू खेळणे व निष्क्रीय खेळ (Playing the Ball, Passive Play) :
अ. चेंडू खेळणे (Playing the Ball)
हे करण्यास परवानगी आहे
अ. खेळाडु हाथ, डोके, धड, मांडी व गुढघ्याच्या साह्याने चेंडू पेकू,पकडू,थांबू, ढकलू व फटकरू शकतो, जमिनीवर अथवा हातामध्ये तीन सेकंद पर्यंत चेंडू पकडू शकतो व तीन पावले चालू अथवा पळू शकतो.
ब. उभे असताना किंवा धावतांना : एकदा चेंडू उसळून (बाउन्स) करून एका हाताने किंवा दोन्ही हाताने पकडू शकतो, एका हाताने चेंडू वारंवार उसळता (ड्रिबल) करता येते व चेंडू एका हाताने किंवा दोन्ही हाताने पकडू अथवा उचलता येते, चेंडू एका हातातून दुसऱ्या हातात घेऊ शकतात, गुढघ्यावर बसून अथवा झोपून चेंडू खेळु शकतो म्हणजेच थ्रो देऊ शकतो.
हे करू शकत नाही
अ. चेंडू नियंत्रणात असेल तर, एका पेक्षा जास्त वेळेस चेंडूला स्पर्श करू शकत नाही. जेव्हा पर्यंत चेंडू जमिनीला स्पर्श करत नाही, दुसरा खेळाडु चेंडूला स्पर्श करत नाही अथवा चेंडू गोल पोस्टला स्पर्श करत नाही तो पर्यंत, तथापि, एकपेक्षा जास्त वेळास चेंडूस स्पर्श केल्याने दंड दिला जात नाही परंतु जर खेळाडूने फमबलीग केल्यास पर्तीस्पर्धी खेळाडूस फ्री- थ्रो दिला जातो.
ब. आक्रमण करणाऱ्या संघातील खेळाडू एक मेकांना चेंडू पास करत असतील त्या वेळेस प्रतिस्पर्धी संघातील खेळाडु पायाने अथवा गुडघ्याच्या खालील भागाने स्पर्श करू शकत नाही, मैदानात पंचांना चेंडू लागला तर खेळ सुरू राहतो, खेळाडू चेंडूसह मैदानाच्या बाहेर एक अथवा दोन्ही पायांनी स्पर्श केला परंतु चेंडू मैदानात असेल अश्या वेळेस विरुद्ध संघास फ्री थ्रो दिला जातो
ब. निष्क्रिय खेळ (Passive Play) :
१. गोल करण्याची कोणतीच क्रीया अथवा प्रयत्न न करता चेंडू जवळ बाळगण्याची परवानगी संघाला नाही, त्याच बरोबर फ्री-थ्रो, थ्रो-इन, थ्रो-ऑफ व गोल कीपर थ्रोच्या अंमलबजावणीसाठी वारंवार उशीर करण्याची परवानगी नाही. सामना चालू असतांना ज्या संघाकडे चेंडूचा ताबा आहे त्यांनी अश्या पद्धतीचे निष्क्रिय खेळल्यास प्रतिस्पर्धी संघास फ्री-थ्रो देऊन चेंडूचा ताबा दिला जातो व ज्या ठिकाणी प्रमाद निश्चित केला जाईल त्या ठिकाणावरून फ्री-थ्रो घेऊन सामना पुन्हा सुरु करण्यात येतो.
२. एखाद्या संघाकडून जर मैदानात निष्क्रिय खेळाचे प्रदर्शन होत असेल अश्यावेळेस पंच प्रथम हात वर उचलून निष्क्रिय खेळ खेळण्याचा इशारा संघात दिला जातो व आक्रमण करण्याची संधी दिली जाते परंतु ही संधी देऊनही आक्रमण करणाऱ्या संघाने पुन्हा निष्क्रिय खेळाचे प्रदर्शित केल्यास विरुद्ध संघास फ्री-थ्रो देऊन चेंडूचा ताबा देण्यात येते.
३. आक्रमण करणाऱ्या संघाकडून हेतुपुरस्कर गोल करण्याची संधी चुकवत असेल अश्या परिस्थितीत पंच हाताचा इशारा न देताही निष्क्रिय खेळ म्हणून विरुद्ध संघास चेंडूचा ताबा देऊ शकतो.
नियम क्र ८ : प्रमाद व खेळाडूस न शोभणारे वर्तन (Fouls and Unsportsmanlike Conduct):
अ. प्रमाद : परवानगी क्रिया
१. दुसर्या खेळाडूच्या हातातून चेंडू मिळविण्यासाठी खुल्या हाताचा उपयोग करू शकता
२. विरुद्ध संघातील खेळाडूंना रोखण्यासाठी मुडपलेल्या कोहानींचा वापर करून प्रतिस्पर्धी खेळाडूवर नियंत्रण ठेवू शकता अथवा पाठलाग करू शकता
३. (ट्रंक) चा कमरेचा वरच्या भागाचा वापर करून प्रतिस्पर्धी खेळाडूला रोखू शकता अथवा पूर्ण स्थिती मिळू शकता
करण्यास परवानगी :
१. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या हातातुन चेँडु ओढणे अथवा टोलवू शकत नाही.
२. प्रतिस्पर्धी बाहू, हात, पायाचा किंवा शरीराच्या कोणत्याही भागाचा वापर करून रोखूशकत नाही अथवा ढकलू शकत नाही असे करणे स्थिर अथवा क्रियाशील असतांना मान्य नाही.
३. प्रतिस्पर्धी खेळाडू मोकळा असतांना त्याच्या शरीराला अथवा गणवेशाला पकडू शकत नाही.
४. प्रतिस्पर्धी खेळाडूवर धावून अथवा उडी मारू शकत नाही.
५. वैयक्तिक प्रमाद अथवा गैरवर्तन केल्यास दिल्या जाणाऱ्या उत्तरोत्तर (ताकीद २. २ मी. खेळातून निलंबन ३. अपात्रत्व) शिक्षा
ब. खेळाडूला न शोभणारे वर्तन
१. तोंडी अथवा हाताचे इशारे दर्शवून पंचांच्या निर्णयावर आपक्षेप दर्शवल्यास, शाब्दिक,
शारीरिक हालचाली अथवा जोरात ओरडून प्रतिस्पर्धी अथवा संघातील खेळाडूना त्रास दिल्यास, प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या थ्रो अंबलबजावणीस उशीर करणे, थ्रोच्या वेळेस ३ मी. अंतराचा आदर न ठेवणे.
२. नाटकच्या (ढोंग) माध्यमातून प्रतिस्पर्धीच्या कृतीसंदर्भात पंचाची दिशाभूल करण्याचा
प्रयत्ने केला अथवा कारवाईचा प्रभाव अतीशयोक्तीकरिता करणे, प्रतिस्पर्धी खेळाडूस अयोग्य शिक्षा देणे, पायाचा वापर करून गोल अथवा पास अवरोधित करणे, वारंवार डावपेच म्हणून गोल एरिया मध्ये प्रवेश करणे (टीप: खेळाडूला न शोभणारे वर्तन केल्यास २ मी. निलंबन, खेळण्यास अपात्र ठरवून त्या विरोधात लेखी तक्रार केली पंच करू शकतो)
नियम क्र ९ : गोल / गुण (Goal) :
अ. चेंडूने संपूर्णपणे आतील गोलरेषा पार केल्या नंतर गोल/गुण दिला जातो. परंतु गोल करणाऱ्या खेळाडूंकडून किंवा त्याच्या संघ सहकाऱ्यांकडून गोल करतांना किंवा करण्यापूर्वी नियमांचे उल्लंघन होता कामा नये.
१. बचाव करणाऱ्या खेळाडुकडून नियमांचे उल्लंघन झाले असेल व चेंडू अतील गोल रेषेच्या आत गेला असेल अशा वेळेस गोल दिला जातो, पंच किंवा वेळाअधिकारीर्यांनी चेंडू आतील गोल रेषा ओलंडन्या पुर्वी सामना थांबवल्यास गोल दिला जात नाही, विरोधी संघातील खेळाडूने स्वतःच्या गोलपोस्टमध्ये चेंडू टाकल्यास त्यांच्या विरुद्ध संघाला गुण दिला जात, गोलकीपर व्यतिरिक्त अन्य कुणी चेंडू गोल पोस्ट मध्ये जाण्यापासून (उदाहरणार्थ प्रेक्षक) आडवत असेल तर गोल दिला जातो.
ब. पंचानी गोल दिल्यानंतर तो नाकारता येणार नाही. पंचानी गोल / गुण दिल्याचे स्पस्ट करावे. गोल झाल्यानंतर सत्र संपल्याची शिट्टी वाजली तर सत्र थांबवण्या पूर्वी थ्रो ऑफ घेऊ शकतात.
क. गोल झाल्यानंतर त्वरीत त्याची नोंद गुणपत्रकात करावी. जो संघ प्रतिस्पर्धी संघा पेक्षा अधिक गोल नोदावेल तो संघ विजयी ठरतो, दोन्ही संघांचे समान गुण झाल्यास सामना अनिर्णीत समजला जातो.
नियम क्र १० : थ्रो ऑफ (Throw Off)
१. सामन्याच्या सुरुवातीला ज्या संघाने नाणेफेक जिंकला आहे, तो संघ बॉलचा ताबा घेऊन सामना सुरू (Start) करण्याची निवड करतो तो संघ सामन्याची सुसुवात थ्रो-ऑफ घेऊन सुरू करतो अथवा जो संघ नाणेफेक जिंकून बचाव (एन्डस) निवडतो अश्यावेळेस त्यांच्या विरोधी संघाने थ्रो-ऑफ घेऊन सामना सुरु करावा. ज्या संघाने सामन्याच्या पहिल्या सत्रात थ्रो-ऑफ घेऊन सामना सुरु केला आहे त्याच्या विरोधी संघाने सामन्याच्या दुसऱ्या सत्रात थ्रो-ऑफ घेऊन सामना सुरु करावा. ज्या संघाने पहिल्या सत्रात थ्रो ऑफ घेतला आहे तो संघ दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू करण्यासाठी थ्रो ऑफ घेऊ शकत नाही. सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटला असेल तर पुढील प्रत्येक अतिरिक्त वेळेत नाणेफेक करून थ्रो-ऑफ चा निर्णय करावा.
२. गोल झाल्यानंतर प्रत्येक वेळी थ्रो ऑफ घेऊन खेळ सुरु करावा
३. थ्रो ऑफ घेताना मैदानाच्या मध्यभागापासून कोणत्याही दिशेला घेता येतो. (मध्य रेषेच्या मध्य भागापासून डाव्या व उजव्या बाजूला 1.5 मीटर पर्यंत) पंचांनी थ्रो ऑफ ची शिट्टी वाजवल्यानंतर तीन सेकंदाच्या आत थ्रो-ऑफ घ्यावा.
४. प्रत्येक सत्राच्या सुरुवातीचा थ्रो-ऑफ घेताना (अतिरिक्त वेळेच्या खेळासाठी सुद्धा) सर्व खेळाडू हे स्वताःच्या कोर्टमध्ये मध्ये असणे बंधन आवश्यक आहे. गोल झाल्यानंतर थ्रो-ऑफ घेतांना विरुद्ध संघातील खेळाडू कोणत्याही कोर्ट मध्ये थांबू शकतो. थ्रो-ऑफ घेतांना वेळेस विरुद्ध संघातील खेळाडू हे थ्रो- ऑफ घेणाऱ्या खेळाडू पासून तीन मीटर अंतरावर असणे बंधनकारक आहे.
नियम क्र ११: थ्रो-इन (Throw-in) :
अ. चेंडू ज्यावेळेस पूर्णपणे साइड लाईन च्या बाहेर जातो त्या वेळेस थ्रो-इन दिला जातो. संरक्षण करणाऱ्या संघातील खेळाडुचा बाह्य गोल रेषा ओलांडण्यापूर्वी शेवटचा चेंडूचा स्पर्श होता तेव्हा अश्या वेळेस थ्रो- इन दिला जातो. तसेच चेंडूचा मैदानच्या छताला किंवा बाहेरील बाजूला स्पर्श झाला तर थ्रो-इन दिला जातो.
ब. थ्रो-इन घेताना पंचांच्या शिट्टीच्या इशाऱ्याशिवाय ज्या संघाकडून चेंडूला शेवटचा स्पर्श होत साईड लाईन, गोल लाईन च्या बाहेर चेंडू जातो अथवा मैदानाच्या छताला स्पर्श होतो त्यांच्या विरुद्ध संघाला थ्रो- इन मिळतो.
क. थ्रो-इन घेताना चेंडू मैदानाच्या साईड लाईन वरून ज्या ठिकाणाहून बाहेर गेला त्याच ठिकाणाहून घ्यावा, चेंडू गोल रेषेच्या बाहेरून गेला असेल तर बाजू रेषा (साईड लाईन) व गोल रेषा जेथे काटकोनात एकत्र येतात (कॉर्नर) त्या ठिकाणाहून थ्रो-इन घ्यावा.
ड. चेंडू छताला किंवा इतर बाहेरच्या बाजूला लागला असेल तर ज्या ठिकाणी चेंडू लागला आहे त्याच्या जवळच्या बाजू रेषेवरून (साईड लाईन) थ्रो-इन घ्यावा, थ्रो-इन घेणाऱ्या खेळाडूने बाजू रेषेवर (साईड लाईन ) एक पाय स्थिर ठेवुन चेंडू खेळाडूच्या हातातून सुटेपर्यंत कायम असावी. दुसरा पाय कुठे ठेवावा ह्या बद्दल कोणतीही मर्यादा नाही.
इ. थ्रो -इन घेत असताना विरोधी संघातील खेळाडू थ्रो -इन घेणाऱ्या खेळाडू पासून किमान ३
मी. अंतरावर असावेत.
नियम क्र १२: गोल कीपर थ्रो (Goal Keeper Throw) :
गोल कीपर थ्रो हा पुढील वेळेस दिला जातो
१. आक्रमण करणाऱ्या संघाच्या खेळाडूने चेंडूसह गोल एरियाध्ये प्रवेश केल्यास
२. गोल रक्षकाने गोल एरियाध्ये चेंडूवर ताबा मिळविल्यास किंवा चेंडू थांबला असेल तर
३. आक्रमण करणाऱ्या खेळाडूने गोल एरियाध्ये घरंगळत जाणाऱ्या चेंडूला स्पर्श केल्यास
४. चेंडू अडवताना गोल रक्षकाचा शेवटचा स्पर्श अथवा विरोधी संघातील खेळाडूचा चेंडूला स्पर्श होवून चेंडू बाह्य गोल लाइन वरून बाहेर गेल्यास वरील सर्व परिस्थितीत मध्ये चेंडू आउट ऑफ प्ले समाजाला जातो व गोलकीपर थ्रो ने खेळ पुन्हा सुरु केला जातो.
५. पंचांच्या शिट्टीच्या इशाऱ्याशिवाय गोलकीपर हा गोल कीपर थ्रो गोल एरिया मधून घेऊ शकतो. गोल रक्षकाने चेंडू फेकल्यानंतर पूर्णपणे गोल क्षेत्र रेषेच्या बाहेर चेंडू येतो त्या वेळेस गोल रक्षक थ्रो मान्य असतो.
नियम क्र १३: फ्री- थ्रो (Free Throw) :
१. संघव्यवस्थापकांनी मैदानात प्रवेश अथवा मैदानाला स्पर्श केल्यास, संघव्यवस्थापकांनी गैरवर्तन केल्यास, सामान्या दरम्यान चुकीच्या पद्धतीने खेळाडु बदल केल्यास, अतिरिक्त खेळाडूने मैदानात प्रवेश केल्यास, निलंबित खेळाडूची वेळ पूर्ण होण्याआधी त्याने मैदानात प्रवेश केल्यास, गोल रक्षक नियंत्रित स्थितीत चेंडू सह गोल एरियाच्या बाहेर आल्यास, गोल रक्षकाने मैदानात स्थिर असलेला चेंडू अथवा घरंगळत असलेला चेंडू गोल एरियाच्या बाहेर असतांना गोल रक्षकाने गोल एरियाच्या आतून चेंडूस स्पर्श केल्यास अथवा गोल गोल एरियाच्या बाहेर असतांना चेंडू गोल रक्षकाने गोल एरियामध्ये घेतल्यास, गोल रक्षकाने खेळाडु एरिया (कोर्ट एरिया) मधून चेंडूसह गोल एरिया मध्ये पुन्हा प्रवेश केल्यास, गोल रक्षकाने चेंडू जर खेळाडु एरिया (कोर्ट एरिया) जात असतांना पायाने अथवा गुढग्या खालील भागाने स्पर्श केल्यास अथवा अडविल्यास.
२. मैदानी खेळाडूंनी चेंडू ३ सेंकंद पेक्षा जास्त वेळ हातात्त पकडल्यास, ३ (तीन) पावले पेक्षा जास्त चाल्यास अथवा पळाल्यास, चेंडू उसळविला व पुन्हा हातात पकडून उसळविलयास (डबल), चेंडू नियंत्रित असतांना गोंधळ (फंबलिंग) केल्यास, चेंडूचा गुढघ्या खालील भागाने अथवा पायाला स्पर्श झाल्यास, खेळाडुने चेंडूसह मैदानाबाहेर जागेस एका किंवा दोन्ही पायाने स्पर्श केल्यास, आक्रमण करतांना वेळ घालविण्यासाठी निष्क्रिय खेळाचे प्रदर्शन केल्यास, थ्रो-ऑफ, फ्री-थ्रो, थ्रो–इन, गोल कीपर थ्रो घेतांना वेळ घालविल्यास,
३. प्रतिस्पर्धी खेळाडुस चेंडू मारल्यास अथवा चेंडू हिस्कविल्यास, प्रतिस्पर्धी खेळाडूस नियम बाह्य (चुकीच्या पद्धतीने) ओढल्यास अथवा रोखल्यास, पकडून ठेवल्यास, ढकल्यास, गणवेश ओढल्यास, प्रतिस्पर्धी खेळाडूवर धावून गेल्यास अथवा त्याचावर उडी मारल्यास, चेंडू ताब्यात असतांना अथवा नसतांना प्रतिस्पर्धी खेळाडूवर धोकादायक आक्रमण केल्यास
४. चुकीच्या पद्धतीने थ्रो-ऑफ, थ्रो-इन घेतल्यास, फ्री-थ्रो घेणाऱ्या संघातील खेळाडूंनी फ्री-थ्रो घेण्यापूर्वी फ्री-थ्रो रेषा (९ मी. रेषाला) स्पर्श केल्यास,
५. पंचानी शिट्टी वाजल्या नंतर ३ (तीन) सेकंदानच्या आत पेनल्टी न मारल्यास, पेनाल्टी थ्रो मारणाऱ्या खेळाडूने ७ मी. पेनल्टी रेषा स्पर्श केल्यास, पेनाल्टी थ्रो अंबलबजावणी नंतर चेंडू गोल पोस्टला अथवा प्रतिस्पर्धी खेळाडूला स्पर्श करण्यापुर्वी चेंडूला स्पर्श केल्यास, पेनाल्टी थ्रो घेणाऱ्या संघातील खेळाडूंनी थ्रो घेण्यापूर्वी ९ मी. रेषेला स्पर्श केल्यास, आक्रमण करणाऱ्या खेळाडूस बचावात्मक पवित्र्यात असतांना धोका निर्माण केल्यास
६. मैदानी खेळाडु (कोर्ट खेळाडु) बचाव करणाऱ्या खेळाडूच्या गोल एरिया मध्ये संघास फायदा घेण्यासाठी प्रवेश केल्यास, थ्रो ऑफ, थ्रो इन व पेनल्टी थ्रो घेतांना उडी घेतल्यास, चुकीच्या जागेवरून थ्रो घेतल्यास अथवा ३ सेंकांदा पेक्षा जास्त वेळ चेंडू हातात ठेवल्यास
७. गोल रक्षकाने नियम बाह्य विरुद्ध संघातील खेळाडूस आडविलयास
फ्री-थ्रो अंमलबजावणी :
१. फ्री-थ्रो ज्या ठिकाणी प्रमाद नोंदविला गेला तेथून पंचांनीच्या शिटीच्या इशाराविना घेण्यात येतो, फ्री-थ्रो ज्या संघाकडे चेंडू असतो त्या संघाच्या गोल एरिया मधून घेता येत नाही अथवा विरुद्ध संघाच्या फ्री थ्रो लाइन च्या आत मधून घेता येत नाही.
२. प्रमाद जिथे नोंदविला जातो त्वरित त्याच्या जवळू म्हणजेच ३ मी. अंतरा पर्यंत घ्यावा.
३. फ्री-थ्रो घेणाऱ्या संघातील खेळाडूंनी (आक्रमण खेळाडु) बचाव करणाऱ्या संघातील खेळाडूंची संघातील खेळाडूना पास देण्या अगोदर फ्री थ्रो रेषाला स्पर्श अथवा त्याचा आत प्रवेश करू नये,
४. पंचानी फ्री थ्रो घेणाऱ्या संघातील खेळाडू हे फ्री थ्रो लाइन व गोल लाइनच्या मध्ये असतील तर त्यांना स्थिती सुधारण्यासाठी इशारा द्यावा व त्या नंतर शिट्टी वाजवून सामना पुन्हा खेळण्यास सुरुवात करावी.
५. फ्री थ्रो घेणाऱ्या संघातील खेळाडूच्या खेळाडूने पास देण्याआधी त्यांच्या संघातील खेळाडूंनी फ्री-थ्रो लाइन व गोल लाइनच्या मध्ये गेले अथवा स्पर्श केलाय्यास प्रतिस्पर्धी संघास फ्री- थ्रो दिला जातो.
६. फ्री थ्रो ची अंबलबजावणी करणाऱ्या खेळाडू पासून प्रतिस्पर्धी खेळाडूने ३ मी. चे अंतर राखणे बंधन कारक आहे. खेळाडूने पास घेणाऱ्या पासून ३ मी. अंतर राखले नाही तर पहिल्यांदा ताकीद दिली जाते व नंतर त्यांनी नियमाचे उल्लनंघण केल्यास २ मी. साठी सामन्यातून निलंबित केले जाते.
नियम क्र १४: ७ मीटर पेनल्टी थ्रो (7- Meter Throw) :
अ. पेनल्टी थ्रो केव्हा दिला जातो.
१. गोल मारण्याची संधी असतांना विरुद्ध संघातील खेळाडु अथवा संघ अधिकाऱ्याने बेकायदेशीररित्या आक्रमणाची संधी वाया घालविल्यास पेनल्टी थ्रो दिली जाते.
२. गोल मारण्याची संधी असतांना पंचांकडून चुकून शिट्टी वाजवली गेल्यास पेनल्टी थ्रो दिली जातो.
३. गोल मारण्याची संधी असतांना सामन्या मध्ये सहभागी नसलेल्या व्यक्तीने मैदानात प्रवेश केल्यास (उदा: प्रेक्षकाने मैदानात प्रवेशकरून अथवा शिट्टी वाजवून खेळाडूस गोल करण्यापासून थांबवल्यास, सामान्या दरम्यान वीजप्रवाह खंडित झाल्यास) पेनल्टी थ्रो दिला जातो.
४. आक्रमण करणाऱ्या खेळाडूस कोणताही अडथळा झाल्यास त्याचा चेंडूवर ताबा व शरीरावर नियंत्रण असतांना गोल करण्याची संधी वाया गेल्यास पेनल्टी थ्रो दिला जातो.
५. पेनल्टी थ्रो (सात मीटरचा) संभाव्य निर्णय असतो तेव्हा पंचानी सात मीटरचा निर्णय खरोखरच न्याय्य आणि आवश्यक आहे की नाही हे स्पष्टपणे निर्धारित होई पर्यंत हस्तक्षेप करू नये. बचाव करणाऱ्या खेळाडूने आक्रमण करणाऱ्या खेळाडूस चुकेच्या पद्धतीने थांबवले व तो गोल नोंदविला गेला तर पंचानी सात मीटरचा निर्णय देऊ नये. या उलट गोल मारण्याची पूर्ण संधी असतानां आक्रमण करणाऱ्या खेळाडूस बचाव करणाऱ्या संघाकडून थांबवल्याने आक्रमण करणाऱ्या खेळाडूचा चेंडूवरील ताबा व शरीराचे नियंत्रण गमावला हे स्पष्ट झाल्यास सात मीटर थ्रो देण्यात येतो.
६. पेनल्टी (७ मी.थ्रो) दिल्यानंतर पंच गरजे नुसार टाइम आउट देऊ शकतो.
पेनल्टी थ्रो ची अंमलबजावणी
१. पंचानी शिट्टी वाजवल्या नंतर ३ सेकांद्च्या आत चेंडू मारावा
२. पेनल्टी थ्रो करणाऱ्या खेळाडूने पेनल्टी रेषेच्या मागे उभे राहवे व रेषेला स्पर्श करू नये.
३. गोल पोस्टला चेंडू स्पर्श झाल्यानंतर पेनल्टी मारणारा खेळाडु अथवा दुसरे खेळाडु पुन्हा चेंडूला स्पर्श करू शकतात.
४. पेनल्टी मारतांन सर्व खेळाडु हे फ्री थ्रो लाइन ला स्पर्श न करता त्या रेषेच्या मागे जो पर्यायंत मारणाऱ्या खेळाडूच्या हात मधून चेंडू सुटत नाही तो पर्यंत उभे असावेत तसेच पेनल्टी मारतांन सर्व खेळाडु हे पेनल्टी रेषा पासून ३ मी. अंतरावर उभे असावेत. खेळाडूंनी फ्री थ्रो रेषेला अथवा त्या रेषेच्या आत मध्ये प्रवेश केल्यास पुन्हा विरुद्ध संघास पेनल्टी देण्यात येते.
५. पेनल्टी थ्रो मारतांना गोल रक्षक, ४ मी. गोल रक्षक प्रतिबंधित रेषेच्या मागे उभा असावा या नियमाचे उल्नंघण केल्यास पुन्हा प्रतिस्पर्धी संघास पेनल्टी देण्यात येते.
६. पेनल्टी थ्रो करणारा खेळाडु चेंडूसह पेनल्टी रेषेच्या जवळ उभा राहिल्या नंतर गोल रक्षक बदलता येत नाही.
नियम क्र १५: थ्रो घेण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना (थ्रो-ऑफ,थ्रो-ईन,गोलकीपर- थ्रो)
General instruction for the execution of the throws (throw-off, Throw-in, Goalkeeper throw, free throw and 7-Meter throw)
फेकणारा (The Thrower) :
१. चेंडू फेकण्या अगोदर चेंडू फेकणारा खेळाडु योग्य स्थितीत असावा व चेंडू फेकणाऱ्या खेळाडूच्या हातामध्ये असावा. थ्रो ची अंबल बजावणी करतांना थ्रो घेणारा खेळाडू योग्य ठिकाणी योग्य स्थितीत असावा गोल कीपर थ्रो वगळता इतर थ्रो घेतांना थ्रो घेणाऱ्या खेळाडूचा कमीत कमी एक पाय थ्रो पूर्ण होईपर्यंत जमिनीवर स्थिर असावा. थ्रो घेतांना दुसरा पाय उचलून खाली ठेऊ शकतो अथवा दुसऱ्या पायाची हालचाल करू शकतो. चेडू फेकणारा थ्रो ची क्रीया पूर्ण होई पर्यंत योग्य स्थितीत असावे.
२. चेंडू फेकनाराच्या हातातून सुटतो तेव्हा थ्रो पूर्ण झाला असे समजले जाते. गोल पोस्ट ला अथवा दुसऱ्या खेळाडूला चेंडूचा स्पर्श झाल्याशिवाय थ्रो घेणारा खेळाडु पुनाः चेंडूला स्पर्श करू शकत नाही.
३. गोलकीपर थ्रो व्यतिरिक्त कोणत्याही थ्रो ने थेट गोल नोंदवता येतो.
४. थ्रो घेणाऱ्यांचे संघालील खेळाडु : थ्रो घेणाऱ्या खेळाडूच्या संघातील खेळाडूं योग्य स्थिती व जागेवर असावेत. थ्रो ची अंबलबजावणी दरम्यान संघातील खेळाडूंनी चेंडूला स्पर्श करू नय अथवा संघातील खेळाडूंच्या चेंडू स्वाधीन करणे आवश्यक नाही.
५. बचाव करणारे खेळाडु :थ्रो घेणाऱ्या खेळाडूच्या हातातून चेंडू सुटे पर्यंत बचाव करणारे खेळाडु योग्य जागेवर व योग्य स्थितीत असावेत.
थ्रो ऑफ, थ्रो इन व फ्री थ्रो घेतांना बचाव करणारे खेळाडु योग्य स्थितीत नसतील व त्यांच्या मुळे आक्रमण करणाऱ्या संघाला नुकसान होत नसेल अश्यावेळी पंचांनी त्यांची स्थिती अथवा जागा योग्य केली नाही तरी चालेल परंतु आक्रमण करणाऱ्या संघाला त्याचा फायदा होणार असेल अश्या वेळी बचाव करणाऱ्या खेळाडूंची स्थिती अथवा जागा पंचांनी हस्थपक्षेप करून स्थिती अथवा जागा योग्य करावी.
सामना पुन्हा सुरू करण्यासाठी शिट्टी चे संकेत
अ. सेवन मीटर थ्रो (पेनाल्टी) व फ्री थ्रो असतांना
ब. थ्रो इन, गोलकीपर थ्रो अथवा फ्री थ्रो च्या प्रकरणामध्ये
टाईम घेतल्यानंतर सामनापूर पुन्हा सुरू करण्यासाठी, फ्री थ्रो घेताना जर विलंब झाला तर, अंबलबजावणी करण्यास विलंब झाल्यास, खेळाडूची स्थिती सुधारल्यानंतर, शाब्दिक सूचना अथवा ताकिद दिल्यानंतर, पंचाने सामना पुन्हा सुरू केल्यानंतर तीन सेकंदाच्या आत थ्रो करणाऱ्या खेळाडूने पास करून सामना सुरू करावा.
नियम क्रमांक १६ : शिक्षा (The Punishments) :
अ. ताकीद (Warning)
१. चेतावणी योग्य शिक्षा
क्रमिक प्रमाद शिक्षेस पात्र असते
खेळाडूला न शोभणारे वर्तन हे उत्तरोत्तर दंडात्मक कृत्य (एका खेळाडूला एका पेक्षा जास्त ताकीद देता येत नाही व संघातील खेळाडूंना तीन पेक्षा जास्त टाकीत घेता येत नाही संघासतील खेळाडूनचे तीन ताकीद पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रत्येक ताकीदेच्या वेळेस खेळाडू दोन मिनिटांसाठी निलंबित केले जाते जर खेळाडू दोन मिनिटे निलंबित झालेला असेल तर त्याला पुन्हा ताकीद दिली जात नाही संघ व्यवस्थापनातील सदस्यांना एकापेक्षा जास्त ताकीद देता येत नाही)
१. खेळाडू अथवा संघ संघव्यवस्थापनातील दोषी असलेल्या व्यक्तीस पिवळे कार्ड दाखवून ताकीद दिली जाते.
ब. २ मी. सामन्या मधून निलंबन (Suspension)
१. सामना चालू असताना चुकीच्या पद्धतीने खेळाडू बदल केल्यास, सामना चालू असताना अधिक खेळाडुने मैदानात प्रवेश केल्यास, खेळाडू बदली भागातून सामन्यांमध्ये हस्तक्षेप केल्यास, खेळाडूने सामना चालू असतांना मैदानात अथवा मैदाना बाहेर गैरवर्तन केल्यास
२. वैयक्तिक एकापेक्षा जास्त ताकीद मिळाल्यास दोन मिनिटांसाठी निलंबित केले जाते
३. संघ व्यवस्थापनातील सदस्यांना दुसरी ताकीद मिळाल्यास
४. पूर्ण सामन्यांमध्ये दोन मिनिटांसाठी निलंबन दोन वेळेस करता येते व पुन्हा त्याच खेळाडूने परत चूक केली असता पुढील दोन मिनिटाचे निलंबन हे खेळाडूला सामना खेळण्यापासून अपात्र ठरविते व रेड कार्ड दिले जाते.
५. रेड कार्ड देऊन सामन्यातून निलंबित केलेल्या खेळाडू निलंबनाची वेळ पूर्ण होईपर्यंत चालू सामन्यांमध्ये प्रवेश करता येत नाही संघ व्यवस्थापनाला त्याच्या जागी दुसरा खेळाडू मैदानात पाठवा.
क. सामन्यासाठी अपात्र अथवा बाद करणे : (Disqualification):
१. सामना चालू असताना खेळाडू ने नियमबाह्य वर्तन केले असेल किंवा खेळाडूस जाणून बुझुन इजा पोहचवली अथवा अपशब्दांचा वापर केला असेल तर त्या खेळाडूस सामन्यातून बाद केले जाते
२. सामना चालू असताना संघ व्यवस्थापनातील व्यक्तींना सामन्यादरम्यान ताकीद व दोन मिनिटांसाठी सामन्यातून निलंबित केले असेल तर त्या व्यवस्थापकास सामन्यासाठी बाद केले जाते.
३. खेळाडूस तिसऱ्या वेळेस २ मी. निलंबनाची शिक्षा मिळाल्यास
४. खेळाडूने टाय ब्रेकर दरम्यान गैरवर्तनाची पुनरावृत्ती केल्यास.
५. रेड कार्ड मिळाल्यानंतर लगेच खेळाडू अथवा संघ व्यवस्थापननातील व्यक्तीस मैदानाचा भाग सोडावा लागतो व तो खेळाडू अथवा संघव्यवस्थापक व्यक्ती सामना संपेपर्यंत संघाशी कोणताही संपर्क ठेवू शकत नाही.
नियम क्रमांक १७ : पंच (The Referees)
१. प्रत्येक सामन्यासाठी समान अधिकार असलेले दोन पंच असतात व त्यांना वेळआधिकारी व गुणलेखक साहाय्यक म्हणून काम करतात.
२. पंचाने खेळाडू व संघ व्यवस्थापकांचे मैदानाच्या भागात आल्यापासून ते मैदान सोडेपर्यंत निरीक्षण करावे
३. सामना सुरू होण्यापूर्वी पंचांनी मैदानातील गोलपोस्ट, जाळी, चेंडूची तपासणी करावी व कोणत्या चेंडूने सामना सुरु करायचे हे ठरवावे
४. खेळाडू हे योग्य गणवेशात मैदानात आहेत की नाही याची खात्री करावी व गुणपत्रक व खेळाडूनी परिधान केलेल्या साहित्याची तपासणी करावी, खेळाडू बदली भागात संघातील राखीव खेळाडू व संघव्यवस्थापनातील व्यक्तींची गुणपत्रक नावे तपासुन संघव्यवस्थापनातील जबाबदार व्यक्ती म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्ती बरोबर ओळख करून घ्यावी
५. दोन्ही पंचान पैकी एका पंचाने संघातील संघव्यवस्थापनातील जबाबदार व्यक्ती म्हणजे अथवा प्रतिनिधी म्हणून संघनायाकाच्या उपस्थितीमध्ये सामन्याचा नाणेफेक करून घ्यावे, पंचांनी आपल्याकडे असलेल्या कार्डवर सामन्यांचे गुण, खेळाडूला दिलेली ताकीद, दोन मिनिटांसाठी निलंबन झालेल्या खेळाडूं अथवा सामन्यासाठी अपात्रतेची नोंद करणे आवश्यक आहे.
६. सामन्याची वेळ नियंत्रणाची जबाबदारी दोन्ही पंचांची असते जर त्यामध्ये काही संख्या उपस्थित झाल्यास दोन्ही पंचांनी संयुक्तरीत्या निर्णय द्यावा
७. सामना संपल्यानंतर गुणपत्रक पूर्ण करण्याची जबाबदारी पंचांची असते
८. पंचांचा निर्णय अंतिम मानला जातो
९. संघ व्यवस्थापनातील जबाबदार व्यक्ती पंचांशी चर्चा करू शकतो
१०. खेळाच्या नियमावलीप्रमाणे पंचांनी निर्णय दिले नसतील तर त्यांच्याविरुद्ध दाद मागू शकतात
११. पंचांना सामना तात्पुरता थांबवण्याचा अथवा कायम स्वरूपी थांबविण्याचा अधिकार आहे
१२. सामना कायम स्वरूपी निलंबित अथवा थांबवण्या पूर्वी सर्व पद्धतीने सामना पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न पंचानी करावा
१३. पंचांचा गणवेश हा काळा रंगाचा असावा असे सुचविले आहे.
१४. पंचांनी शिस्ट मंडळाशी चर्चा करतांना विद्युत उपकरणांचा वापर करून चर्चा करावी
नियम क्रमांक १८ : वेळाअधिकारी आणि गुणलेखक
(The Timekeeper and the Scorekeeper) :
१. सामन्याची वेळेची संपूर्ण जबाबदारी ही वेळा अधिकाऱ्याची असते संघाचे टाईम आउट व खेळाडू २ मी. साठी निलंबित खेळाडूंची नोंद ठेवण्याची जबाबदारी ही वेळा अधिकाऱ्याची असते
२. गुण लेखकाची जबाबदारीही दोन्ही संघांनी केलेल्या गुणांची योग्य नोंदी ठेवणे त्याचप्रमाणे गुणपत्रकआवर असलेल्या खेळाडूंची नावे व संघव्यवस्थापककानातील व्यक्तींची नावे योग्य आहेत की नाही हे तपासणे ज्या खेळाडूंची नावे गुणपत्रक असतील त्यांना सामन्यांमध्ये खेळायचे खेळण्यासाठी परवानगी देणे
३. खेळाडु आदलाबदली च्या वेळेस गुणलेखक व वेळाअधिकारीनी खेळाडू योग्यप्रकारे बदली होत आहे की नाही यावर लक्ष द्यावे
४. सामना गरज असेल त्या वेळेस फक्त वेळाअधिकारी थांबू शकतो
५. पब्लिक अथवा स्कोरबोर्ड उपलब्ध नसेल तर संघ व्यवस्थापनातील जो जबाबदार व्यक्ती आहे त्याला झालेली वेळ, झालेले गुण व सामन्यात किती वेळ शिल्लक आहे याची माहिती द्यावी
६. मैदानावर इलेक्ट्रॉनिक स्कोरबोर्ड व घड्याळ ऑटोमॅटिक सिग्नल उपलव्ध नसेल तर मध्यंतर व अंतिम खेळ समाप्तीची शिट्टी वेळ अधिकाऱ्याने वाजवावी
पंचांचे इशारे
Entering the Goal Area () Illegal dribble Too many steps or
holding the ball for more
than 3 seconds Restraining, holding
or pushing
Hitting Offensive foul Throw-in – direction Goalkeeper throw
Free throw – direction Keep the distance of
3 metres Passive play Goal
Warning (yellow)
Disqualification (red)
written report (blue) Suspension
(2 minutes) Time-out Permission for two persons
हॅण्डबॉल खेळातील मुलभूत कौशल्ये (Handball Basic Skills)
१. धावणे (Running): हॅण्डबॉल मध्ये धावणे हे अत्यंत महत्वाचे व मुलभूत कौशल्य आहे. प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करण्यासाठी त्याच प्रमाणे बचाव करण्यासाठी या कौशल्याची आवश्यक्यता असते. प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण चढविण्यासाठी चेंडू बरोबर म्हणजेच पास करण्यासाठी, गोल मारण्यासाठी, ड्रीबलींग करण्यासाठी त्याचं प्रमाणे बचाव करतांना पुढे मागे येण्यासाठी, डावी उजवीकडे जाण्यासाठी व दिशा बदण्यासाठी धावणे कौशल्ये अतिशय महत्वाचे आहे.
२. उडी मारणे (Jumping): हॅण्डबॉल मध्ये प्रतिस्पर्धी संघावर गोल करुण मात करण्यासाठी तसेच चेंडूचा ताबा मिळविण्यासाठी, प्रतिस्पर्धी खेळाडूला रोखण्यासाठी, विरुद्ध संघातील खेळाडूंचा वाचव भेदून गोल मारण्यासाठी त्याच प्रमाणे चेंडू फेकण्या साठी उडी मारणे हे कौशल्य महत्वाचे आहे या साठी खेळाडूची लोवर बॉडी मजबूत असणे अतिशय महत्वाचे आहे.
३. फेकणे (Passing) : हॅण्डबॉल मध्ये चेंडू एक किवां दोन्ही हाताने अचूक योग्य अंतरावर व योग्य दिशेला पास करावा लागतो त्या कृतीला फेकणे म्हणजेच पासिंग म्हणतात. गोल एरिया जवळ घेऊन जाण्यासाठी अथवा विरुद्ध संघाच्या खेळाडु वर गोल नोंदवण्यासाठी चेंडू फेकणे कौशल्ये आवश्यक असते. विरोधी संघाचा बचाव तोडून आपल्याच संघातील खेळाडूला अचूक पास देणे हे ह्या खेळातील मूलभूत व महत्वाचे कौशल्य आहे. बॉल पास करताना तो विविध पध्द्तीने पास केला जातो. पासिंग चे विविध प्रकार आहेत. (१. पुश पास, २. चेस्ट पास, ३. शोल्डर पास, ४. लॉंग पास, ५. बाऊन्स ६. साईड पास: ७. बॉक पास: ८. ओहरहेड पास, ९.जंप पास, १०. ड्रोप पास)
४. पकडणे (Receiving): चेंडू पकडणे हा हॅण्डबॉल आवश्यक व मुलभूत कौशल्य आहे . चेंडू पकडण्यासाठी दोनही हातांचा उपयोग करणे ही अत्यंत महत्वाची पद्धत आहे. विरुद्ध संघातील खेळाडूनवर गतीयुक्त हलाचाली द्वारे मात करण्यासाठी योग्य चेंडू पकड अत्यंत महत्वाची असते चेंडू पकडतांना हाताचे स्मूथनेस असणे अतंत्य महत्वाचे असते. चेंडू पकडताना हाताची बोटे ही रिल्याक्स व व्यवास्थित चेंडूवर ठेवलेली असावीत जेणे करून वेगात आलेला चेंडू हातात व्यवस्थित पकडता येईल. चेंडू पकडताना हाताची बोटे व हाताचे आगाठे पसरलेले पाहिजेत व आंगठ्यानच्या एकमेकांना स्पर्श अथवा त्यांची टोके एकमेकांकडे असली पाहिजेत म्हणजेच इंग्रजीतील मूळ अक्षरातील डब्लू () च्या सारखी आकार झाला पाहिजे. चेंडू पकडतांना हाताची बोटे ही चेदुच्या मागे असल्याने छाती वर चेंडू जाण्यापासून प्रतिबंधित केला जातो.
५. ड्रीबलींग (Dribbling) : हॅण्डबॉल मध्ये चेंडू एका हाताने जमिनीवर मारण्याच्या क्रियेला ड्रीबलींग म्हणतात. यामध्ये बॉल हातात आल्यानंतर प्रथम बॉल चा टप्पा जमिनीवर टाकणे व ही क्रीया चालू ठेऊन खेळाडु चालू किंवा पळू शकतो. ड्रीबलींग करतांना बॉल हातात पकडता येत नाही, पास देण्याच्या कौशल्या बरोबरच चेंडूला टप्पा देणे हा मुलभूतक कौशल्य मनाला जातो. ड्रीबलींग प्रतिस्पर्धी खेळाडूपासून अंतर ठेऊन व चेंडू आपल्या शरिरा जवळ टेवावे. ड्रीबलींग करतांना प्रतिस्पर्धी खेळाडूच्या स्थिती नुसार आपण तीन प्रकारे करू शकतो.
१. हाय ड्रीबलींग, २. मेडीयम ड्रीबलींग, ३. लो ड्रीबलींग
६. शूटिंग (Shooting): हॅण्डबॉल मध्ये गोल करण्यासाठी खेळाडूचे शूटिंग कौशल्य अचूक असणे आवश्यक आहे, जेणे करूण जास्तीत जास्त गोल करून आपल्या संघास विजयी करता एइल. शूटिंग करतांना शरीराचे कमरे खालील व वरच्या भाग व्यस्थ असतात. शूटिंग हा चेंडू फेकण्या सारखाच असतो फक्त फरक इतकाच की या मध्ये कमरेच्या, पायाच्या क्रीया ह्या गतिमान व ताकतवान असतात हॅण्डबॉल शूटिंग हे खालील प्रकार केले जाते.
अ. स्टँअडिंग शूटिंग - खेळाडूला चेंडू मिळाल्यानंतर जागेवर उभा राहून बचाव करणाऱ्या संघालील खेळाडूंची वाचव करण्याची स्थिती नुसार शूटिंग करतो, स्टँडिंग शुट करतेवेळी दोन्ही पायामधे योग्य अंतर, चेंडूची व्यवस्थित पकड, चेंडू शुट करतेवेळी हाथ मागे घेऊन गतिमान पद्धतीने खांद्याच्या वर आणावा त्याच प्रमाणे आपल्या शरीराचा भार मागच्या पायावरून पुढील पायावर बदलावे व चेंडूचा अचूक निशाणा लावत गोल पोस्ट मध्ये चेंडू फेकावे.
आ. साईड स्टँडिंग शूटिंग : खेळाडूला बॉल मिळाल्यानंतर जागेवर उभा नराहता बचाव करणाऱ्या संघालील खेळाडूंची स्थिती नुसार हाथ बाजूला ठेऊन शूटिंग करतो, साईड स्टँडिंग करतेवेळी दोन्ही पायामधे योग्य अंतर, चेंडूची व्यवस्थित पकड, बरोबर हाताची चेंडू शुट करते वेळीच हाथ मागे घेऊन गतिमान पद्धतीने हाथ बाजूला घेउण शरीराचा भार बचाव करणारया खेळाडूंच्या स्थिती नुसार बदलावे व कमरेतून डावी उजवी कडे वाकून गोल पोस्ट वर अचूक निशाणा लावत चेंडू फेकावा.
इ. जंप शुट : खेळाडूला चेंडू मिळाल्यानंतर तिसऱ्या स्टेप च्या वेळेस उंच उडी घेत चेंडू फेकणाऱ्या हाता बरोबरच कंबरमागे घेत शरीर जमिनीवर पोहोचण्या आधी अचूक निशाणा लावत चेंडूच्या व्यवस्थित पकडी सह खांद्याच्या वर हाथ घेऊन गोल पोस्ट मध्ये चेंडू फेकावा.
ई. साईड जंप शुट : खेळाडूला चेंडू मिळाल्यानंतर तिसऱ्या स्टेप च्या वेळेस उंच उडी घेत चेंडू फेकणाऱ्या हाता बरोबरच कंबरमागे घेत शरीर जमिनीवर पोहोचण्या आधी अचूक निशाणा लावत चेंडूच्या व्यवस्थित पकडी बचाव करणाऱ्या संघातील केलादुंच्या स्थिती नुसार कंबररेतून डावी उजवी कडे वाकत खांद्याच्या बरोबरीत हाथ घेऊन गोल पोस्ट मध्ये चेंडू फेकावा.
उ. डाइव्ह शुट : डाइव्ह शुटचा वापर जास्त करून पिव्होट खेळणारा खेळाडु व विंगर खेळाडु वरोबरच,पेनल्टी च्या वेळेस केला जातो.
ऊ. पेनल्टी शुट : पेनल्टी शुट : पेनल्टी शुट करते वेळी पेनल्टी रेषेला स्पर्श न करता रेषेच्या मागे उभे राहून व पायाचा जमिनीवरचा संपर्क न तोडता, अचूक निशाणा लावत चेंडूच्या व्यवस्थित पकडीसह, गोल पोस्टवर योग्य निशाणा लावत चेडू शुट करावा.
ऋ. बॉडी फेंक (हूल देऊन गोल करणे) (Body Feint) : बॉडी फेंक हे एक हॅण्डबॉल खेळातील मुलभूत कौशल्य आहे. आक्रमण च्या वेळेस खेळाडूंना स्वत:ला बचाव करणाऱ्या खेळाडून पासून मुक्त करण्यास सक्षम करते व गोल करण्यासाठी, चेंडू पास करण्यासाठी अथवा चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी योग्य जागा बनविण्यास बॉडी फेंकच्या माध्यमातून केली जाते. बॉडी फेंक खांद्याच्या हालचाली, हाताची हालचाल त्याच प्रमाणे कंबर व पायाच्या हालचालीचा जास्त उपयोग होतो, या मध्ये फिरणे (pivoting), वळणे (turning), हूल देणे (fake), बचाव करणाऱ्या खेळाडूस विचलितकरणे (हूल देउण) गोल पोस्ट मध्ये अचूकतेने चेंडू शुट करतो. हे एक वैयक्तिक आक्रमण करण्यासाठी प्रभावी पणे वापरले जाते त्याच बरोबर तांत्रिक घटक आहे जे आक्रमण करणाऱ्या खेळाडूला स्वत: ला डिफेंडरपासून मुक्त करण्यास सक्षम करण्यासाठी उपयोगी पडते.
ऌ. बचाव (Defiance): हॅण्डबॉल मध्ये आक्रमण करणाऱ्या संघातील खेळाडूना रोखण्यासाठी बचाव करण्याची आवशक्यता असते. बचाव करतेवेळी शरीराचा तोल सांभाळण्यासाठी दोन्ही पायांमध्ये योग्य आंतराबरोवर गुढग्यातून किंचित वाकून आक्रमण करणाऱ्या खेळाडूच्या स्थिती नुसार पवित्रा व हात वर बाजूला असावेत. आक्रमण करणाऱ्या खेळाडूस रोखण्यासाठी अथवा संघाचा बचाव मजबूत बनविण्यासाठी संधातील खेळाडून सोबत समन्वय असणे आवश्यक असते. बचावाच्य वेगवेगळ्या पद्धती (६-०, ५-१, ४-२, ३-३, ३-२-१, म्यान टू म्यान बचाव) आक्रम करणाऱ्या संघातील खेळाडूंचा अभ्यास अथवा निरिक्षण करून योग्य ती बचावात्मक पद्धतीचा वापर करावा.
ऍ. गोल रक्षक (Goal Keeper): हॅण्डबॉल खेळामध्ये गोल रक्षक हा खेळाचा निर्णायक घटक असतो. गोल रक्षक हा आक्रमण करणाऱ्या संघातील पहिला व बचाव करणाऱ्या संघातील शेवटचा घटक मनाला जातो. गोल रक्षकाणे गोल पोस्ट मध्ये उभा राहतांना पायामध्ये ३० सें.मी कमी अंतर ठेऊ नये, गुधग्यामध्ये किंचित वाकत दोन्ही पायाच्या पंज्या वरती आपल्या शरीराचे समान वजन ठेवावे व शरीर, थोडे पुढे झुकवावे, डोके वर व नजर ही चेंडूवर असावी. हाथ हे कोपऱ्यातून थोडे वाकलेले, हाताचा तळवा छातीच्या अथवा डोक्याच्या रेषेवर, कोपरा बाजूला असावा. ज्या बाजूला चेंडू आडवयाचा आहे त्या बाजूला हाथ व पायाचा उपयोग करावा त्याच प्रमाणे गोल पोस्ट कोपऱ्यातील चेंडू अडविण्यासाठी आवश्यकता नुसार उडी मारावी व पाय फाकवावे.
हॅण्डबॉल स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक साहित्याची \ बाबींची यादी
एका मैदनाकरीत
अ.न स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक साहित्य संख्या अ.नं. जनरल
१. पंच ०२ १. स्टेशनरी
२. स्कोरर ०१ अ. पेपर
३. वेळाधिकारी ०१ ब. पेन
४. बॉल (हॅण्डबॉल) ०२ क फाईल्स
५. गोल पोस्ट ०१ जोडी ड. स्टेपलर
६. नेट १ जोडी इ. स्टेपलर पिन्स
७. शिट्टी ४ नग ई. पंचिंग मशीन
८. मेजरिंग टेप ५० मी. १ नग
९. मैदान आखणी साठी
दोरी ५० मी. १ बंडल २. साऊड सिस्टम
१०. चुना (फक्की) ३ गोणी
११. खिळे २६ ३. बैठक व्यवस्था
१२. हवा पंप ०१ अ. पंच (रेफरी)
१३. टेबल १ ब. गुणलेखक
१४. खुर्ची ८ क. वेळा अधिकारी
१५. घडयाळ (स्टोप वाच) ३ ड. खेळाडु
१६. स्कोर शीट १ इ. संघ व्यवस्थापक
१७. बादली व मग १ ई. प्रेक्षक
१८. खुर्ची खेळाडू व संघव्यवस्थापक बसण्यासाठी ४
१९. पिवळा कार्ड ४ ४. पिण्याच्या पाणी व्यवस्था
२०. लाल कार्ड ४ अ. पंच (रेफरी)
२१. निळा कार्ड ४ ब. गुणलेखक
२२. हिरवा कार्ड (टाइम आऊट) ६ क. वेळा अधिकारी
२३. पेन १ ड. खेळाडु
२४. पेन्सील १ इ. संघ व्यवस्थापक
२५. सेफ्टी पिन - ई. प्रेक्षक
२६. टाचणी -
२७. बिब्स १२
२८. पाण्याचे जार ४
२९. ग्लास ४
गुणपत्रक (Score sheet) :
संदर्भ सुची (References) :
१. डॉ. सोपान कांगणे (२००७) हॅण्डबॉल (प्रथम आवृत्ती), डायमंड पब्लिकेशन्स, पुणे.
२. डॉ. व्यंकटेश वांगवाड (१९८५) हॅण्डबॉल कसा खेळावा (प्रथम आवृत्ती)पार्वती प्रकाशन संस्था, पुणे.
३. डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी (१९८९) क्रीडा ज्ञानकोश, शालिनी प्रकाशन, पुणे.
४. प्रोफेसर. जॉन्सन बोर्जस (२००८), डायमंड क्रीडा ज्ञानकोश (प्रथम आवृत्ती) डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
५. Dr. B. J. Srinivasaraju (2012) Sports History, Sports Publication, New Delhi
६. Handball New-Rules of the Game (2016). International Handball Federation Website /Home page Retrieved. 18 March 2020, from http://www.ihf.info
७. Retrieved. 18 March 2020, from https://en.wikipedia.org/wiki/Handball
८. Istvan Juhasz, Dr. Melinda Bíró et.all (n.d) Ball games: Retrieved. 18 March 2020, from https://sporttudomany.uni-eszterhazy.hu/
९. Dr Ilona Hapkova, Dr Luísa Estriga, Craig Rot (n.d). TEACHING HANDBALL Retrieved. 18 March 2020, from http://www.calheat.com/
१०. Handball-Skill (n.d) Retrieved. 18 March 2020, from http://educacionfisicajoanmiro.profitbc.com
११. Retrieved. 18 March 2020, from https://www.google.co.in/
१२. Retrieved. 18 March 2020, from https://www.google.co.in
१३. Handball (n.d). Wikipedia Homepage. Retrieved, on January 10, 2011, from http://www.coachesinfo.com
१४. Handball (n.d.) Olympics Home page. Retrieved, March 16, 2009 From, http://www.olympic.org/
१५. History of Handball (n.d.). International Handball Federation Website /Home page Retrieved. 15 January 2009, from http://www.ihf.info
No comments:
Post a Comment