शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे काय ?
शारीरिक तंदुरुस्ती हा आपल्या शरीराचा अभिभाज्य घटक मनाला जातो. शारीरिक तंदुरुस्ती मानवी शरीराचे कार्य सुव्यवस्थित ठेवते व दैनंदिन कार्यमान सक्षम करते तसेच अधिक चांगले दिसण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी मदत करते. शारीरिक व्यायाम, संतुलित आहार व आराम या तीन गोष्टीनमुळे शारीरिक तंदुरुस्ती संतुलित ठेवता येते. शारीरिक तंदुरुस्ती मध्ये हृदय व फुफुसाचे कार्यमान, शरीराच्या स्नायूंची कार्यक्षमता, लवचिकता व शरीरधारणा चा समावेश असतो. त्याच प्रमाणे जे आपण आपल्या शरीराबरोबर करतो त्याचा आपल्या मानसिकतेवर म्हणजेच मानसिक सतर्कता व भावनिक स्थिरतेवर परिणाम दिसून येतो. तंदुरुस्त आसण म्हणजे सशक्त, सक्षम, शारीरिक दुखापती , आजार आणी दुखणी यांना बळी न पडण होय. शारीरिक सुदृढ अथवा तंदुरुस्त असलेली व्यक्ती, जीवनाचा आनंद घेऊ शकते.
“ शारीरिक सुदृढता हाच खरा जीवनाचा मुल मंत्र आहे” व “रोग विरहित जीवन जगण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती खुप महत्वाची आहे" हे दोन्ही वाक्य जर आपण व्यवस्थित पणे समजावून घेतले तर असे लक्षात येईल की शारीरिक सुदृढता अथवा तंदुरुस्ती किती महत्वाची आहे. व्यायाम केल्यावर शरीराबरोबरच, मनाला किती फायदा मिळत असतो. तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम केल्याने आपल्या मधील दैनंदिन काम करण्यासाठीचा उत्साह सळसळतो अथवा द्वीगुणित होतो, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायची तयारी वाढते आणी शरीराला जाणवणारे चैतन्य तर अप्रतिम/ लाजबाब होतो. व्यायामा केल्यामुळे दैनंदिन जीवनातील सगळी कर्तव्य पार पडण्यासाठी खंबीरपणा , सामर्थ्यता येते त्याच बरोबर तरुण दिसण्यासाठी मदत होते असते . शारीरिक स्वास्थ टिकवण्यासाठी तंदुरुस्ती हे प्रतिबंधक औषध असून, दैनंदिन व्यायाम केल्याने आपले बरेसचे शारीरिक स्वास्थ संबधीचे प्रश्न सुटतात. साधारणता ९० टक्के व्यक्ती ह्या व्यायाम वजन कमी करण्यासाठी करतांना आढळतात परंतु वजन कमी करण्यासाठी व्यायाम न करता तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करावे असे मला वाटते. शारीरिक सुधृदातेने आपले तन , मन, एकाग्रता, ताकद , लवचिकता , सहनक्षमता, चपळता, बळकटी, आत्मविश्वासा बरोबरच आपल्या लक्षात न येणारे फायदेसुद्धा शरीराला होतात.
तंदुरुस्त असलेली व्यक्ती जीवनाचा आनंद खुप चांगल्या पद्धतीने घेत असते. शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्यासाठी शारीरिक हालचाल व शारीरिक व्यायाम करणे महत्वाचे आहे. प्रसिद्ध फिटनेस प्रशिक्षक लीना मोगरे यांच्या मते “आपल्या सुप्त क्षमतांचा जास्तिजास्त विकास होऊ देणे म्हणजे तंदुरुस्ती”. “तंदुरुस्त राहाण म्हणजे सकाळी हसत मुख उठण होय.
शारीरिक तंदुरुस्ती बाबत वेगवेगळ्या व्यक्तींची व आरोग्य संघटनांची वेगवेगळी मत
“…the ability to carry out daily tasks with vigor and alertness without undue fatigue and ample energy to enjoy leisure-time pursuits and meet unforeseen emergencies.” (COUNCIL OF PH
"Fitness was defined as the capacity to carry out the day’s activities without undue fatigue."
"अनावश्यक थकवा नघेता जोमाने व सतर्कतेने दैनंदिन काम पार पडण्याची क्षमता त्याच प्रमाणे रिकाम्या वेळी जीवनाचा आनंद उपभोगता योतो आणी अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी असणारी पुरेशी उर्जा म्हणजे शारीरिक तंदुरुस्त."
"अनावश्यक थकवा नघेता जोमाने व सतर्कतेने दैनंदिन काम पार पडण्याची क्षमता त्याच प्रमाणे रिकाम्या वेळी जीवनाचा आनंद उपभोगता योतो आणी अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी असणारी पुरेशी उर्जा म्हणजे शारीरिक तंदुरुस्त."
"शारीरिक सुधृढता म्हणजे जीवनातील मानसिक ताण तणाव सहन करून त्यातून समाधानकारक रीतीने बाहेर पडण्यास साहाय्य करणारी उपयुक्त शक्ती."
" व्यक्तीच्या कार्यात्मक आरोग्यात सहभागी असलेल्या विविध शारीरिक मानसिक क्षमता म्हणजे शारीरिक सुधृढता. "
"शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे एकत्रितपणे व कार्यक्षमतेने शरीरयंत्रणेची कार्य करण्याची क्षमता की जि निरोगी राहण्यास व दैनंदिन जीवनातील क्रीया करण्यास परवानगी देते."
व्यक्ती कार्यक्षम असणे म्हणजे
कमीतकमी प्रयत्नांन मध्ये दैनंदिन काम
करणे. तंदुरुस्त व्यक्ती हा आपले दैनंदिन काम करण्यास, कैटंबिक
व घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास तसेच खेळ व विश्रांतीच्या उपक्रमांचा
आनंद घेण्यासाठी पुरेसी उर्जा बाळगण्यास सक्षम असतात. शारीरिक तंदुरुस्त व्यक्ती
ह्या सामान्य जीवनातील कोणत्याही परिस्थितीला प्रभावीपणे प्रतिसाद देतो व आपतकालीन
परिस्थितीला देखील प्रतिसाद देतो- उदा. मदतीसाठी धावणे अथवा संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करणे.
वरील सर्व तज्ञ व्यक्तींच्या
संज्ञान नुसार शारीरिक तंदुरुस्ती वाढविण्यासाठी व्यायाम करणे अतिशय महत्वाचे आहे.
व्यायाम केल्याने आपली विचार प्रक्रिया
बदलते, मानसिक तानतणाव कमी होण्यास मदत होते आणी सकारात्मकता वाढीला लागते त्याच
प्रमाणे कोणत्याही समस्येला तोंड द्यायची सिद्धता
वाढण्या बरोबरच व्यक्तीला मानसिक
उभारी मिळते, तजेलदार त्वचा, चमकदार केस, सुडोल बांधा, तरतरी व मन प्रसन्न, सकारात्मक दुष्ट्रीकोन बरोबरच वजन कमी होऊन
शारीरिक बांधा चांगला होतो. त्याच बरोबर
चरबिविरहित धातू (लीन मसल टिशयु ) चांगला असतो त्यामुळे वजन वाढत नाही आणी चयापयाशी
दर (बेसल मेटँबोलिक रेट) नेहमीच उच्च पातळीवर राहतो.
“वरील सर्व गोष्टींचा
विचार केला असता आपल्याला लक्क्षात येयील की आपला शारीरिक बांधा व आपली देहयेस्टी आपल्या आवडत असेल तर आपली मनः स्थिती
व आरोग्य चांगले राहते.” जर आपण आपल्या स्वास्थचा विचार केला तर कोणताही आजाराचे
निदान करण्यासाठी ज्या प्रमाणे आपण आपले रक्ताच्या चाचणीचे अहवाल आवश्यक असतात
त्याच प्रमाणे आपले शारीरिक तंदुरुस्ती तपासण्यासाठी शरीरातील बॉडी फँट चे प्रमाण,
आपली
श्वासण क्षमता, स्नायूंची ताकद,
स्नायूंची सहनशक्तीक्षमता, लवचिकपणा, पकड, मजबुती आणी पोटांच्या स्नायूंची
ताकद या गोष्टी तपासल्या पाहिजे. त्या तून व्यक्तीच्या शारीरिक क्षमतांची पातळी
मिळते. त्या वरून आपल्या शारीरिक ताम्दुरुतीच्या व्यायाम प्रकारचे आराखडे बनवावे व
व्यायाम करावा.
शेवटी अस म्हणतात ना “खेळ खेळण्यासाठी तंदुरुस्त व्हा, तंदुरुस्त होण्यासाठी खेळा कडे वळू नका.”
संदर्भ : WHO Webpage

Nice one. Dr. अभिनंदन 🌹✌🏻👍🏼
ReplyDelete